News Flash

नोकरीची संधी

आसाम रायफल्स ग्रुप-बी आणि ग्रुप-सीच्या एकूण ७५४ पदांच्या भरती

प्रतिनिधिक छायाचित्र

आसाम रायफल्स ग्रुप-बी आणि ग्रुप-सीच्या एकूण ७५४ पदांच्या भरतीसाठी टेक्निकल आणि ट्रेड्समन रिक्रुटमेंट रॅली २०१७-१८  दि. ५ जानेवारी २०१८ पासून घेणार आहे.

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी रिक्तपदांचा तपशील पुढीलप्रमाणे :

ग्रुप-बी पदे –

नायब सुभेदार

१) बिल्डिंग आणि रोड (JCO) (पुरुष उमेदवार) – खुलागट – १ पद.

पात्रता – डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअिरग. वयोमर्यादा – १८ ते २३ वर्षे.

२) स्टाफ नर्स (महिला) – इमाव – १, खुला – १.

पात्रता – दहावी उत्तीर्ण. नìसगमधील डिप्लोमा. हिंदीचे कामचलाऊ ज्ञान. वयोमर्यादा – १८-२५ वर्षे.

ग्रुप सी पदे.

१) क्लर्क (पुरुष) हवालदार – खुला – २ पदे.

पात्रता – बारावी उत्तीर्ण. इंग्रजी टायिपग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग – ३० श.प्र.मि. वेगाची कॉम्प्युटरवर स्कील टेस्ट. वयोमर्यादा – १८-२५वर्षे.

२) पर्सोनल असिस्टंट – वॉरंट ऑफिसर (पुरुष) – अजा – १, इमाव – १, खुला – १.

पात्रता – बारावी उत्तीर्ण. स्टेनोग्राफी डिप्लोमा. स्कील टेस्ट. दहा मिनिटांसाठी डिक्टेशन ८० श.प्र.मि. ट्रान्सक्रिप्शन वेळ – इंग्रजी – ५० मि., हिंदी – ६५ मि. कॉम्प्युटरवर. वयोमर्यादा – १८-२५ वर्षे.

३) इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल (पुरुष) (रायफलमन) – खुला – १.

पात्रता – गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांसह दहावी उत्तीर्ण.

४) लाइनमन फिल्ड (पुरुष) (रायफलमन) – खुला -१.

पात्रता – दहावी उत्तीर्ण. इलेक्ट्रिशियन ट्रेड आयटीआय

५) रेडिओ मेकॅनिक (पुरुष) (वॉरंट ऑफिसर) – इमाव – १, खुला – १.

पात्रता – बारावी उत्तीर्ण. रेडिओ आणि टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरींग/डोमेस्टिक अप्लायन्सेसमधील ३ वर्षांचा डिप्लोमा.

६) सव्‍‌र्हेअर (पुरुष) हवालदार – खुला – १.

पात्रता – दहावी +आयटीआय उत्तीर्ण. वयोमर्यादा – २०-२८  वर्षे.

७) महिला अटेंडंट आया – खुला – १.

पात्रता – इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांसह दहावी उत्तीर्ण.

८) इलेक्ट्रिशियन – (पुरुष) (रायफलमन) – अजा – १, खुला – १.

पात्रता – दहावी, आयटीआय उत्तीर्ण.

९) नìसग असिस्टंट (पुरुष) रायलफमन – खुला – १.

पात्रता – गणित, इंग्रजी, विज्ञान (बायोलॉजीसह) विषयांसह दहावी उत्तीर्ण.

१०) एक्स-रे असिस्टंट (पुरुष) हवालदार – इमाव – १, खुला – २.

पात्रता – बारावी उत्तीर्ण  रेडिओलॉजी डिप्लोमा.

११) लॅबॉरेटरी असिस्टंट (पुरुष) रायफलमन – खुला – १.

पात्रता – इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांसह दहावी उत्तीर्ण.

१२) फार्मासिस्ट (पुरुष आणि महिला) वॉरंट ऑफिसर – अजा – १, इमाव – १, खुला – १.

पात्रता – बारावी उत्तीर्ण. फार्मसी पदवी किंवा पदविका (२ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर ३ महिन्यांची इंटर्नशीप ५०० तासांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगसहित ज्यातील २५० तास प्रत्यक्षात प्रिस्क्रीप्शन देण्याचा अनुभव.)

फार्मसी अ‍ॅक्ट कलम ३३ नुसार नोंदणी आवश्यक. वयोमर्यादा – २०-२५ वर्षे.

१३) महिला सफाई – इमाव -१, खुला – १.

१४) बार्बर (पुरुष) – इमाव – १, खुला – १.

१५) कुक (पुरुष) – अजा – १, इमाव – १, खुला – २.

१६) पुरुष सफाई – इमाव – १, खुला – १.

१७) वॉशरमन – (पुरुष) – खुला – १.

१८) इक्विपमेंट आणि बुट रिपेअरर (पुरुष) – खुला – १.

१९) आर्मरर (पुरुष) – खुला – १. एकूण ३७ पदे. (अजा – ४, अज – ०, इमाव – ९, खुला – २४)

(पद क्र. १३ ते १९ ची पदे रायफलमन (रँकची आहेत).

पात्रता – दहावी उत्तीर्ण) (वयोमर्यादा – पद क्र. ४,५,७ ते ११आणि १३ ते १९ साठी १८ ते २३ वर्षे). वयोमर्यादेसाठी दि. १ जानेवारी २०१८ कट ऑफ डेट असेल. (उच्चतम वयोमर्यादेत सूट. अजा/अज – ५ वर्षे, इमाव –  ३ वर्षे.) विकलांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. उमेदवारांनी पाठविलेला पहिला अर्ज पात्र ठरविला जाईल.

शारीरिक मापदंड – (PST) (क्लर्क आणि पर्सोनल असिस्टंट पदे वगळता इतर पदांसाठी)

उंची – पुरुष – १७० सें.मी., महिला – १५७ सें.मी. (अज – पुरुष – १६२.५ सें.मी., महिला – १५० सें.मी.) छाती – पुरुष – ८० ते ८५ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

शारीरिक मापदंड – क्लर्क आणि पर्सोनल असिस्टंट पदांसाठी

उंची – पुरुष – १६५ सें.मी. (अज – १६२.५सें.मी.) छाती – ७७ ते ८२ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

शारीरिक क्षमता चाचणी (PET) (A) पुरुष – ५ कि.मी. २४ मिनिटांत धावणे. (ब) महिला – १.६ कि.मी. ८.३० मिनिटांत धावणे.

लेखी परीक्षा – १०० गुणांची (खुलागटासाठी किमान  ३५ गुण आणि इमाव/अजा/अजसाठी ३३% गुण आवश्यक).

ट्रेड टेस्ट (स्कील टेस्ट) – सखोल वैद्यकीय चाचणीपूर्वी सर्व उमेदवारांची ट्रेड टेस्ट (स्किल टेस्ट घेतली जाईल.)

अर्जाचे शुल्क –  बिल्डिंग अ‍ॅण्ड रोड,  स्टाफ नर्ससाठी रु.२००/- इतर पदांसाठी रु. १००/- (अजा/अज/महिला/माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

शारीरिक मापदंड (PST) आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET) साठी केंद्र –

(१) डिफू (आसाम), (२) लोक्रा (आसाम), (३) डिमापूर (नागालँड), (४) जोरहार (आसाम), (५) सिलचार (आसाम), (५) शिलाँग (मेघालय).

अजा/अज/इमाव उमेदवारांनी संबंधित दाखले (विहित नमुन्यातील) शारीरिक मापदंड चाचणी (PST)च्या वेळी सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www.assamrifles.gov.in

या संकेतस्थळावर दि. २० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जाची आणि कॉल लेटरची प्रिंट आऊट कॉपी आणि फी पेमेंट रिसिप्ट/चलान इ. शारीरिक मापदंड चाचणी (PET) च्यावेळी सादर करणे आवश्यक. (ओरिजिनल (मूळ) आणि फोटोकॉपी) ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्जाचे शुल्क भरण्याचा ऑप्शन मिळेल. (परीक्षा शुल्क एसबीआय  करंट अकाऊंट नंबर ३७०८८०४६७१२ वर  HQ, DGAR,Recruitment Branch, Shilong -१०  यांच्याकडे भरावे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2017 4:03 am

Web Title: job opportunity in india job vacancies in india government jobs 2017
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : ई- प्रशासनातील पुढचे पाऊल
2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
3 नोकरीची संधी
Just Now!
X