ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागासाठी क्लस्टर योजनेकरिता पुढील नमूद पदे एकत्रित वेतनावर ६ महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने भरणार.

(१) आरेखक – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३).

पात्रता – आयटीआयचा स्थापत्य आरेखक पाठय़क्रम उत्तीर्ण.

(२) डेटा एन्ट्री ऑपरेटर – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३).

पात्रता –  पदवी परीक्षा उत्तीर्ण. एमएससीआयटी उत्तीर्ण. इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.

(३) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३).

पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.

(४) कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) – १ पद.

पात्रता – माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदवी उत्तीर्ण.

वेतन – पद क्र. (३) व (४) साठी रु. २५,०००/- प्रतिमाह. पद क्र. (१) – रु. १८,०००/- प्रतिमाह. पद क्र. (२) – रु. १३,०००/- प्रतिमाह.

वयोमर्यादा – दि. ११ डिसेंबर, २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय -१८ ते ४३ वर्षे).

सर्व पदांसाठी २ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

विस्तृत जाहिरात http://www.thanecity.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहिरातीमध्ये अर्जाचा विहित नमुना उपलब्ध करून दिला आहे. विहित नमुन्यातील अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून दि. ११ डिसेंबर २०१७पर्यंत recruitment.tmc.2017@gmail.com  या ई-मेल आयडीवर पाठवावा (जन्मतारीख, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके, अनुभव आणि जातीचा दाखला.)

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (अकअळरछ), मुंबई ‘हँडीमॅन’ च्या एकूण १०० पदांची तीन वर्षांच्या मुदतीसाठी करार पद्धतीने भरतीसाठी वॉकइन इंटरव्ह्य़ू दि. ९ डिसेंबर, २०१७ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत.

ठिकाण – सिस्टीम्स अ‍ॅण्ड ट्रेनिंग डिव्हिजन, दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, एअरपोर्ट गेट नं. ५ जवळ, सहार पोलीस स्टेशन, सहार, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९९.

पात्रता – एअरपोर्ट/एअरलाइन/ग्राऊंड हँडिलग एजन्सीमधील किमान ६ महिन्यांचा कामाचा अनुभव.

निवड पद्धती – (अ) स्क्रीनिंग, (ब) निवड प्रक्रिया वॉकइनच्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी पूर्ण केली जाईल.

वयोमर्यादा – दि. १ डिसेंबर, २०१७ रोजी २८ वर्षेपर्यंत. (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षेपर्यंत)

वेतन – दरमहा रु. १६,०८०/-. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात http://www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह (मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी) वॉकइन्सच्या वेळी सादर करणे आवश्यक.