News Flash

नोकरीची संधी

यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा २०१८ साठी परीक्षापूर्व प्रशिक्षण २०१७-१८ करिता प्रवेश.

प्रतिनिधिक छायाचित्र

आयएएस/आयपीएस/आयएफएस/आयआरएस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी), मुंबई येथे ११ महिन्यांचे विनामूल्य मार्गदर्शन.

यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा २०१८ साठी परीक्षापूर्व प्रशिक्षण २०१७-१८ करिता प्रवेश.

प्रवेश परीक्षा दि. १२ नोव्हेंबर, २०१७ रोजी फक्त मुंबई केंद्रावर घेण्यात येईल.

प्रवेश क्षमता – १०० अल्पसंख्याक – १०  बार्टीद्वारा अनुदानित अनुसूचित जातीसाठी १०. एकूण १२०.

पात्रता – पदवी परीक्षा उत्तीर्ण (कोणत्याही शाखेची).

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट, २०१८ रोजी २१ ते ३२ वर्षे (इमाव/विजा/भज/विमाप्र – २१-३५ वर्षे; अजा/अज – २१ ते ३७ वर्षे).

प्रवेश परीक्षा पद्धत – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा

(१) सामान्य अध्ययन (भाग – १) – ५० प्रश्न १०० गुण.

(२) सामान्य अध्ययन (भाग – २) – ४० प्रश्न १०० गुण. परीक्षेसाठी माध्यम इंग्रजी एकूण कालावधी दोन तास. प्रवेश अर्ज शुल्क रु. ३००/- (मागासवर्गीय रु. १५०/-).

ऑनलाइन अर्ज <http://www.siac.org.in/>या संकेतस्थळावर दि. २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन (जाहिरात क्र. ०१/२०१७) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांतील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये ‘महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ’ या संवर्गातील ‘वैद्यकीय अधिकारी’च्या एकूण ३९४ पदांची भरती.

(अज – १३, अजा – ३१, विजा – १०, भज-ब – ८, भज-क – १०, भज-ड – ४, विमाप्र – ५२, इमाव – १०४, खुला – १६२)

पात्रता – एमबीबीएस किंवा इंडियन मेडिकल काऊंसिल अ‍ॅक्ट, १९५६ च्या शेडय़ुल-१ किंवा शेडय़ुल-२ नुसार समकक्ष पात्रता परीक्षा उत्तीर्ण.

विस्तृत जाहिरात <http://www.arogya.maharashtra.gov.in/> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्जाचा नमुना डाऊनलोड करून संपूर्णत: भरून सादर केलेला अर्ज, मूळ प्रतिज्ञापत्र व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह ‘आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, मुंबई – ४०० ००१’ या पत्त्यावर समक्ष अगर टपालाद्वारे दि. २० सप्टेंबर २०१७ पर्यंत पाठवावेत.

राज्य आरोग्य सोसायटी, मुंबईअंतर्गत मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कंत्राटी/निव्वळ करार तत्त्वावर ‘कार्यक्रम सहायक’च्या ४१ पदांची भरती. (अज – ७, इमाव – ७, भज (ब) – १, भज (क) – ३, खुला – २३) एकत्रित वेतन दरमहा रु. ९,६००/-.

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. (एमएससीआयटी किंवा सीसीसी पात्रता).

वयोमर्यादा – ३८ वर्षे (मागासवर्गीय – ४३ वर्षे). निवड झालेल्या उमेदवारांना ३१ मार्च, २०१८ पर्यंत नेमणूक दिली जाईल. (११ महिन्यांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती) कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

ए-४ आकाराच्या कोऱ्या कागदावर अर्ज करावा ज्यात (१) अर्ज केलेल्या पदाचे नाव, (२) ठळक अक्षरात स्वत:चे संपूर्ण नाव, (३) अर्जदाराचा पत्ता, दूरध्वनी/भ्रमणध्वनी, ई-मेल आयडी, (४) शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्मतारीख, (५) शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशील – अभ्यासक्रमाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणांची टक्केवारी इ. बाबी अंतर्भूत असाव्यात आणि त्याबद्दलची प्रमाणपत्रे/जातीचा दाखला इ. जोडणे आवश्यक. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दि. २० सप्टेंबर २०१७ राहील. अर्ज ‘आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डीमेलो रोड, मुंबई – ४००००१’ या पत्त्यावर पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2017 2:42 am

Web Title: job opportunity in india job vacancies in india indian government jobs 3
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : स्पेनमध्ये पाठय़वृत्ती मिळवा!
2 कुपोषणाबाबत शासनाच्या उपाययोजना
3 इन्स्टिटय़ूट ऑफ रेल ट्रान्सपोर्टचे अभ्यासक्रम
Just Now!
X