*  व्हेरिएबल एनर्जी साक्लोट्रोन सेंटर,

(डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, भारत सरकार) कोलकाता येथे ‘स्टायपेंडीअरी ट्रेनी’ पदांची भरती.

(जाहिरात क्र. व्हीईसीसी – २/२०१७)

स्टायपेंडीअरी ट्रेनी (कॅटेगरी – १) (एकूण पदे १२).

(१) फिजिक्स (५ पदे – यूआर – २, इमाव, अजा, अज प्रत्येकी – १)

पात्रता – बीएस्सी किमान ६०% गुण. पुढील विषयांसह (अ) फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा (ब) पीएम स्टॅट्स किंवा (क) पीएम कॉम्प्युटर सायन्स किंवा (ड) पीएम इलेक्ट्रॉनिक्स. जर फिजिक्स प्रिन्सिपल सब्जेक्ट असेल तर त्यात ६०% गुण आवश्यक.

(२) मेकॅनिकल (१ पद यूआर).

(३) इलेक्ट्रॉनिक्स (५ पदे. यूआर – २, यूआर (ओएच) – १, इमाव – १, अजा – १),

(४) सिव्हिल (१ पद यूआर)

पद क्र. (२), (३) व (४) साठी पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

स्टायपेंडीअरी ट्रेनी (कॅटेगरी – २)

(एकूण २५ पदे).

(५) इंजिनीअरिंग ड्राफ्टिंग (२ पदे – यूआर – १, एसटी – १).

(६) फिटर (३ पदे. यूआर – २, अजा – १).

(७) इलेक्ट्रॉनिक्स (११ पदे. यूआर  – ४,

यूआर (ओएच) – १, अजा – ४, अज – १).

(८) इलेक्ट्रिकल (७ पदे. यूआर – ४,

अजा – २, अज – १).

(९) मशिनिस्ट (१ पद यूआर)

पद क्र. (५) ते (९) साठी पात्रता – १० वी विज्ञान आणि गणित विषयांसह उत्तीर्णसंबंधित ट्रेडमधील आयटीआय किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(१०) डेंटल टेक्निशियन (हायजिनिस्ट मेकॅनिक्स) (२ पद यूआर).

पात्रता – १२वी ६०%  गुणांसह उत्तीर्ण. दोन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन (हायजिनिस्ट मेकॅनिक्स) उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०१७ रोजी

स्टायपेंडीअरी ट्रेनी (कॅटेगरी – १) १९ ते २४ वर्षे.

स्टायपेंडीअरी ट्रेनी (कॅटेगरी – २) १८ ते २२ वर्षे.

उच्चतम वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे,

विकलांग – १०/१३/१५ वर्षे.

स्टायपेंड – कॅटॅगरी – १ साठी रु. १६,०००/- प्रथम वर्ष – प्रतिमाह. रु. १८,०००/-, द्वितीय वर्ष – कॅटॅगरी – २ साठी रु. १०,५००/- प्रतिमाह.

(प्रथम वर्ष) आणि रु. १२,५००/- (द्वितीय वर्ष). यशस्वीरीत्या दोन वर्षांचे ट्रेिनग पूर्ण केल्यानंतर स्टायपेंडिअरी ट्रेनी (कॅटॅगरी -१) प्रशिक्षणार्थीना सायंटिफिक असिस्टंट/सी आणि कॅटॅगरी – २ प्रशिक्षणार्थीना टेक्निशियन/सी किंवा टेक्निशियन/बी पदावर नेमणूक केली जाऊ शकते.

प्रशिक्षणादरम्यानची कामगिरी आणि मुलाखतीतील कामगिरी यांवर आधारित ३ इन्क्रीमेंट किंवा टेक्निशियन/बीसाठी निवड ठरविली जाते.

वेतन – सायंटिफिक असिस्टंट/सी –

रु. ४४,९००/-  इतर भत्ते (लेव्हल – ७),

टेक्निशियन/सी – रु. २५,५००/-

इतर भत्ते (लेव्हल – ४), टेक्निशियन/बी – रु. २१,७००/- इतर भत्ते (लेव्हल – ३).

विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या

दि. ९ सप्टेंबर २०१७ च्या अंकात पाहावी. जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज (ए-४ आकाराच्या कागदावर) पूर्णपणे भरून ैळँी Assistant Personnel Officer, (GA), Variable Energy Cyclotron Centre, Department of Atomic Energy, Sector – 1, Block – आ, Bidhan Nagar, Kolkata – 700 064′

या पत्त्यावर दि. २३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.