ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १ वर्ष कालावधीच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी प्रवेश.

पात्रता – दि इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया किंवा दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया यांची इंटरमिडिएट परीक्षा आणि १२वी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. कॉस्ट अकाऊंट्स आणि चार्टर्ड अकाऊंट्ससाठी प्रत्येकी १० जागा.

ट्रेनिंगचे ठिकाण – मुंबई, उरण, बडोदा इ.

पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीस बोलाविले जाईल. अंतिम निवड मुलाखतीतील कामगिरीनुसार. उमेदवारांना दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड दिले जाईल. विस्तृत जाहिरात  http://www.ongcindia.com/ या संकेतस्थळावर पाहावी. जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज anuradhasuresh59@gmail.com किंवा venugopal_anuradha@ongc.co.in या ई-मेल आयडीवर दि. १८ सप्टेंबर २०१७ पर्यंत मेल करावेत.

आयआयटीज आणि आयआयएस्सी संस्थांमध्ये एमएस्सी (दोन वष्रे), जॉइंट एमएस्सी – पीएचडी, एमएस्सी – पीएचडी दुहेरी पदवी आणि इतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

ही जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी – २०१८ (जेएएम – २०१८) आयआयटी बॉम्बेकडून ११ फेब्रुवारी २०१८ला घेण्यात येईल.

ही परीक्षा पुढील विषयांवर आधारित असेल.

(१) बायोटेक्नॉलॉजी (बीटी),

(२) केमिस्ट्री (सीवाय),

(३) जीओलॉजी (जीजी),

(४) मॅथेमॅटिक्स (एमए),

(५) मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स (एमएस),

(६) फिजिक्स (पीएच).

पात्रता – विज्ञानामधील संबंधित विषयातील पदवी किमान सरासरी ५५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना गुणांची अट ५०% सरासरी) पदवीच्या अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. (पात्रता परीक्षा पास केल्याचा पुरावा दि. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करता येणे आवश्यक.)

जेएएम परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, गोवा इ. जेएएम – २०१८ ची मेरिट लिस्ट  http://jam.iitb.ac.in/ या संकेतस्थळावर दि. २० मार्च, २०१८ रोजी प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवार ७ पकी कोणत्याही एका अथवा दोन विषयांसाठी अर्ज करू शकतात.

अर्जाचे शुल्क – महिला/अजा/अज/ विकलांगांसाठी – एका विषयाचे रु. ७५०/-, तर दोन विषयांसाठी रु. १०५०/-.  इतरांसाठी एका विषयाचे रु. १,५००/-. तर दोन विषयांसाठी रु. २,१००/-

ऑनलाइन अर्ज  http://jam.iitb.ac.in या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.

डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी), गिरीनगर, पुणे  ४११०२५ या संस्थेत नॉन टिचिंग पदांची भरती. (जाहिरात क्र. ०४/एनटीएस-२०१७)

(ही एक स्वायत्त संस्था आहे, जी संरक्षण मंत्रालयअंतर्गत काम करते.)

(१) लायब्ररी असिस्टंट (५ पदे) (यूआर – ३, अज -१, इमाव -१) वेतन – ३६,३८४/-.

(२) ग्रॅज्युएट अप्रेंटिस – लायब्ररी सायन्स (६ पदे), कॉम्प्युटर इंजिनीअरिंग (२ पदे)

स्टायपेंड दरमहा रु. ४,९८४/-. अर्जाचा नमुना  http://www.diat.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह जॉइंट रजिस्ट्रार (अ‍ॅडमिन), डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (अभिमत विद्यापीठ), गिरीनगर, पुणे – ४११ ०२५ या पत्त्यावर दि. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.