गेल इंडिया लिमिटेडमध्ये एकूण १५१ पदांची एस -५ आणि एस – ३ ग्रेडवर भरती. एस – ५ ग्रेडमधील पदे. (१) फोरमन (इलेक्ट्रिकल) – ४० पदे. पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरगमधील पदविका किमान ६०% गुणांसह २ वर्षांचा अनुभव. (२) फोरमन (इन्स्ट्रमेंटेशन) – ३५ पदे. पात्रता – इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरगमधील पदविका किमान ६०% गुणांसह २ वर्षांचा अनुभव. (३) ज्युनियर केमिस्ट – १२ पदे. पात्रता – एमएस्सी (केमिस्ट्री) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण २ वर्षांचा अनुभव. (४) ज्युनियर सुपरिटेंडंट (ऑफिशियल लँग्वेज) – ५ पदे. पात्रता – िहदी लिटरेचरमधील पदवी किमान ५५%  गुणांसह  िहदीतून इंग्रजीत ट्रान्स्लेशनमधील पदवी/पदविका ३ वर्षांचा अनुभव.  एस – 3 ग्रेडमधील पदे. (१) असिस्टंट (स्टोअर्स अँड पच्रेस) – १५ पदे. पात्रता – पदवी किमान ५५% गुणांसह  कॉम्प्युटरवरील स्कील १ वर्षांचा अनुभव. (२) अकाऊंट्स असिस्टंट – २४ पदे. पात्रता – बी.कॉम., कॉम्प्युटर स्कील १ वर्षांचा अनुभव. (३) मार्केटिंग असिस्टंट – २० पदे. पात्रता – बीबीए/बीबीएस/ बीबीएम/बीएमएस पदवी किमान ५५% गुणांसह  १ वर्षांचा अनुभव, कॉम्प्युटर स्कील. वयोमर्यादा – दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी एस – ५ पदांसाठी ३० वष्रे, एस – ३ पदांसाठी २८ वष्रे. (अजा/अज/विकलांग यांना पात्रता परीक्षेतील गुणांत ५%  गुणांची सवलत) फी – अजा/अज/विकलांग यांना फी माफ, इतरांना रु. ५०/-. ऑनलाइन अर्ज www.gailonline.com वर दि. १५ सप्टेंबर २०१७ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.

काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च  (सीएसआयआर), नवी दिल्ली ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि लेक्चरशिप’साठी पात्रता परीक्षा ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ (जी सीएसआयआर आणि यूजीसी एकत्रितपणे दि. १७ डिसेंबर, २०१७ रोजी घेणार आहे.) पात्रता – एमएस्सी किंवा बीई/बीटेक/बीफार्म/एमबीबीएस किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजसाठी गुणांची अट ५०% ) बीएस्सी उत्तीर्ण होऊन एमएस्सीला प्रवेश घेतलेले उमेदवार नेट परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. वयोमर्यादा – दि. १ जुल २०१७ रोजी जेआरएफ (नेट) साठी २८ वष्रे (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज/विकलांग/महिला – ३३ वष्रे). लेक्चरशिपसाठी कमाल वयोमर्यादेची अट नाही. परीक्षा पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (एमसीक्यू) परीक्षा २०० गुणांसाठी. कालावधी तीन तास. पुढील विषयांवर आधारित घेतली जाते. – लाइफ सायन्सेस,  अर्थ, अ‍ॅटमॉस्पेरिक, ओशन आणि प्लॅनेटरी सायन्सेस, मॅथेमॅटिकल सायन्सेस,  केमिकल सायन्सेस,  फिजिकल सायन्सेस. परीक्षेचा निकाल मार्च/एप्रिल, २०१८ दरम्यान जाहीर होईल. सीएसआयआर स्कीम अंतर्गत हा रिझल्ट १ जुल, २०१८ पासून २ वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य़ धरला जाईल. परीक्षा केंद्र – भारतभरातील २७ केंद्रांवर परीक्षा होईल. उदा. बंगलोर, हैद्राबाद, रायपूर, गुंतूर, नागपूर, पुणे इ. उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी की नेटसारख्या परीक्षेसाठी मुंबई केंद्र नाही. परीक्षा शुल्क – जनरल – रु. १,०००/-, इमाव (एनसीएल) – रु. ५००/- अजा/अज/विकलांग – रु. २५०/-. ऑनलाइन अर्ज www.csirhrd.res.in या संकेतस्थळावर १६ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे १५ सप्टेंबर २०१७ ऑनलाइन अर्जाची पिंट्रआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह ‘डेप्युटी सेक्रेटरी एक्झामिनेशन युनिट, सीएसआयआर, पुसा, नवी दिल्ली -११००१२ या पत्त्यावर साध्या पोस्टाने दि. २३ सप्टेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. उमेदवारांची यादी दि. १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत एचआरडी मिनिस्ट्रीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.