इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) (जाहिरात क्र. ३७/२०१७), हैद्राबाद ‘ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी’ पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ६६. डिसिप्लीननुसार रिक्त पदांचा तपशील.

१) ECE – २५ पदे.

पात्रता – बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअर/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर).

२) EEE – १२ पदे.

पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअर/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरमधील पदवी.

३) EXIY – ३ पदे.

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेंट इंजिनीअर/इन्स्ट्रमेंट अँड कंट्रोल इंजिनीअर/इन्स्ट्रमेंट इंजिनीअरमधील पदवी.

४) CSE – १० पदे.

पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरमधील पदवी.

५) CIVIL- ६ पदे.

पात्रता – सिव्हिल इंजिनीअरमधील पदवी.

६) मेकॅनिकल – ७ पदे.

पात्रता – बी.ई. मेकॅनिकल/मेकॅनिकल (प्रोडक्शन) इंजिनीअर.

७) केमिकल – ३ पदे.

पात्रता – बी.ई. केमिकल इंजिनीअिरग. पदवी परीक्षेत सरासरी किमान ६५% गुण आवश्यक. (अजा/अजसाठी ५५ % गुण आवश्यक.)

वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर, २०१७ रोजी २५ वष्रेपर्यंत (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे, विकलांग – ३५/३८/४० वष्रेपर्यंत.)

अर्जाचे शुल्क – रु. ५००/- (अजा/अज/विकलांग/माजी सनिक यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT/).  मुलाखत. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर इ.

संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर अर्ज करण्यास पात्र नाहीत. उमेदवारांनी हॉल टिकेटच्या दोन प्रती एउकछ च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड कराव्यात. तसेच त्याची िपट्र काढून दोन्ही प्रतींवर पासपोर्ट साइज फोटो लावून परीक्षेच्या वेळी बरोबर नेणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www.ecil.co.in या संकेतस्थळावर दि. २२ डिसेंबर, २०१७ (१६.००) पर्यंत करावेत. कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट दि. ७ जानेवारी, २०१८ रोजी होईल.

एअर इंडिया एमआरओ, नागपूर, एअर इंडिया इंजिनीअिरग सíव्हसेस लिमिटेड ट्रेड्समन/बेंच फिटर’ (एकूण १२) पदांची ५ वर्षांच्या कालावधीसाठी करार पद्धतीने भरती.

फिटर – १२  पदे (अजा – १, इमाव – ३, खुला – ८).

पात्रता – दि. १ नोव्हेंबर २०१७ रोजी फिटर ट्रेडमधील आयटीआय एनसीटीव्हीटीसह उत्तीर्ण. १ वर्षांचा अनुभव. (एअर बस/बोईंग फ्लिटमधील) कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी ४५ वष्रेपर्यंत (इमाव – ४८, अजा/अज – ५० वष्रेपर्यंत.)

पात्र उमेदवारांना मेल किंवा संकेतस्थळावरून निवड प्रक्रियेसाठी पुढील पत्त्यावर उपस्थित राहण्यासाठी सूचित केले जाईल. ‘ऑफिस ऑफ द जनरल मॅनेजर, एम्आर्ओ नागपूर, एअर इंडिया, प्लॉट नं. १, सेक्टर ९, एस्ईझेड नोटीफाईड एरिया, खाप्री रेल्वे स्टेशनजवळ, मिहान, नागपूर – ४४१ १०८’.

वेतन – १ वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. १५,०००/- त्यानंतर रु. १७,६८०/- (वाढण्याची शक्यता) जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. २० डिसेंबर, २०१७ पर्यंत वरील पत्त्यावर पोहोचतील असे पाठवावेत.

अर्जाचा नमुना www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.