भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), क्षेत्रीय मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई (जाहिरात क्र. अ-०१/११/२०१७/ WR ) – कनिष्ठ साहाय्यक (अग्निसेवा) ज्युनियर असिस्टंट (फायर सíव्हस) एनई- ०४ लेव्हलच्या एकूण १७० पदांची भरती.

(अजा – १४, अज – २३, इमाव – ३७, यूआर – ९६)

पात्रता – मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायरमधील डिप्लोमा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण किंवा बारावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना किंवा मध्यम वाहन चालविण्याचा परवाना दि. ३१ डिसेंबर, २०१७ पूर्वी किमान १ वर्ष आधी जारी केलेला असावा किंवा हलकं वाहन चालविण्याचा परवाना दि. ३१ डिसेंबर, २०१७ पूर्वी किमान २ र्वष आधी जारी केलेला असावा.

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी १८ ते ३० वष्रे. (अजा/अज -१८ ते ३५ वष्रे, इमाव – १८ ते ३३ वष्रे) पुरुष – उंची – १६७ सें.मी.

छाती – ८१ ते ८६ सें.मी. वजन – किमान ५५ कि. महिला – उंची – १५७ सें.मी.

वजन – किमान ४५ कि.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-

(अजा/अज/माजी सनिक यांना फी माफ).

निवड पद्धती –  कॉम्प्युटरवर लेखी परीक्षा – प्राथमिक अंकगणित, विज्ञान, प्राथमिक इंग्रजी/ग्रामर आणि सामान्यज्ञान या विषयांवर आधारित (प्रत्येकी २५ गुणांसाठी) एकुण १०० गुण घेतली जाईल. कालावधी – दोन तास. कागदपत्र तपासणी,  वैद्यकीय/शारीरिक मोजमाप परीक्षा.  ड्रायिव्हग टेस्ट आणि शारीरिक क्षमता चाचणी.

ट्रेिनग – बेसिक ट्रेिनग १८ आठवडे  २ आठवडे वाहनांची देखभाल. ट्रेिनग दरम्यान नियमानुसार स्टायपेंड दिले जाईल. ऑनलाइन अर्ज http://aai.aero/en/careers/recruitment वर दि. ५ जानेवारी २०१८पर्यंत करावेत.

नॅशनल अर्काइव्हज् ऑफ इंडियातर्फे ३७ वा शॉर्ट टर्म सर्टििफकेट कोर्स अर्काइव्हज मॅनेजमेंटघेण्यात येणार आहे. कालावधी ५ फेब्रुवारी, २०१८ ते १६ मार्च २०१८.

कोर्समागील उद्देश – प्रशिक्षणार्थीना दस्तऐवज (शासकीय रेकॉर्ड) बद्दल संपादन, व्यवस्था, देखभाल आणि पुनप्र्राप्ती याची माहिती देणे.

पात्रता- पदवी कोणत्याही शाखेतील.

वयोमर्यादा- ३० वष्रेपर्यंत.

रजिस्ट्रेशन फी – रु. १००/- क्रॉस्ड इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट  Director General, National Archives of India, Janpath, New Delhi – 110 001′ यांचे नावे देय असावी.

कोर्स फी – रु. ३००/- प्रवेश घेतेवेळी भरावी.

विहीत नमुन्यातील अर्ज (एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ९ डिसेंबर, २०१७ च्या अंकात दिल्याप्रमाणे) किंवा (www.nationalarchives.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.)

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. १२ जानेवारी, २०१८