21 February 2019

News Flash

नोकरीची संधी

संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

इंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष/महिला इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सनाशॉर्ट सíव्हस कमिशनसाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (ओटीए), चेन्नई येथे ऑक्टोबर, २०८ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.

एसएससी (टी) ५१ पुरुष (एसएससीडब्ल्यू (टी)२२) रिक्त पदांचा तपशील.

१) सिव्हिल इंजिनीअरिंग – पुरुष – ४९ पदे, महिला – ४ पदे.

२) मेकॅनिकल – पुरुष – १६, महिला – ३

३) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स -पुरुष – २२, महिला – २.

४) एअरोनॉटिकल/एव्हिएशन/बॅलॅस्टिक्स/ एव्हिऑनिक्स – पुरुष – १२.

५) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/आयटी – पुरुष – ३१, महिला – ३.

६) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन  – पुरुष – २८, महिला – २.

७) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/फायबर ऑप्टिक्स इ. – पुरुष – ११.

८) प्रोडक्शन इंजिनीअरिंग – पुरुष – ३.

९) आíकटेक्चर/बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – पुरुष – ३. (एकूण पुरुष- १७५, महिला – १४)

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

पद क्र. ५साठी कॉम्प्युटर सायन्स (आयटीसाठी एमएस्सी उत्तीर्णसुद्धा पात्र आहेत.)

(अंतिम वर्षांचे उमेदवार ज्यांचा निकाल १ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत लागणार आहे ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर, २०१८ रोजी २० ते २७ वष्रे.

उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी. ट्रेनिंग – ४९ आठवडय़ांचे ट्रेनिंग ओटीए, चेन्नई येथे. ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास मद्रास युनिव्हर्सटिीकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज् दिला जाईल आणि कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल.

(पे मॅट्रिक्स लेव्हल – १०)

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर Officer Entry Apply/login वर क्लिक करून Registration Apply Online या िलकमधून दि. १५ फेब्रुवारी, २०१८ (दुपारचे १२.०० वाजेपर्यंत) करावेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतलघुलेखक/लघुटंकलेखकपदांची भरती. (एकूण रिक्त पदे – ९८)

(मंत्रालयातील प्रशासकीय विभाग/बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयामधील रिक्त पदांचा तपशील)

१) लघुलेखक – उच्च श्रेणी (मराठी) – ६ पदे/७ पदे,

२) लघुलेखक – उच्च श्रेणी (इंग्रजी) – ४पदे/१४ पदे.

३) लघुलेखक – निम्न श्रेणी (मराठी) – १२ पदे/१० पदे.

४) लघुलेखक निम्न श्रेणी (इंग्रजी) – ८ पदे/१४ पदे,

५) लघुटंकलेखक (मराठी) – ६ पदे/५पदे,

६) लघुटंकलेखक (इंग्रजी) – ४ पदे/८ पदे.

पात्रता – दहावी उत्तीर्ण, एमएसबीआयटी, लघुलेखन व टंकलेखनाचे शासकीय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक.

मराठी/इंग्रजी लघुलेखनाचा वेग –  लघुलेखक उच्च श्रेणी – १२० श.प्र.मि.; लघुलेखक निम्न श्रेणी – १०० श.प्र.मि.; लघुटंकलेखक – ८० श.प्र.मि.

सर्व पदांसाठी टंकलेखनाचा वेग –

मराठी – ३० श.प्र.मि.; इंग्रजी – ४० श.प्र.मि. वयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी १८ ते ३८ वष्रेपर्यंत (मागासवर्गीय ४३ वष्रेपर्यंत).

निवड पद्धती – वस्तुनिष्ठ स्वरूपाची चाचणी परीक्षा – १०० गुण,  लघुलेखन/ टंकलेखन चाचणी – ७५ गुण,  मुलाखत – २५ गुण. चाचणी परीक्षेचे गुण अंतिम निकालासाठी विचारात घेण्यात येणार नाहीत.

शुल्क – अमागास  रु. ३७४/-, मागासवर्गीय रु. २७४/-.

ऑनलाइन अर्ज  https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

First Published on February 9, 2018 12:17 am

Web Title: job opportunity job alert 7