News Flash

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१७ आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत मोठय़ा संधी –

पं. दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘उमेद’ या प्रकल्पांतर्गत राज्यात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.

युवा विकास व्यावसायिक – विपणन व गैरकृषी जीवनस्तर – नियुक्तीचे ठिकाण- बेलापूर, नवी मुंबई.

युवा विकास व्यावसायिक- महिला-किसान सशक्तीकरण परियोजना – नियुक्तीचे ठिकाणी- बेलापूर, नवी मुंबई.

युवा विकास व्यावसायिक – ज्ञान व्यवस्थापन – नियुक्तीचे ठिकाण- बेलापूर, नवी मुंबई.

युवा विकास व्यावसायिक- स्टार्टअप – ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम – नियुक्तीचे ठिकाण- सोलापूर.

विशेष सूचना : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार दरमहा ३५०० ते ४००० रु. मासिक एकत्रित वेतन देण्यात येईल.

जिल्हा अभियान व्यवस्थापक – उपलब्ध जागांची संख्या ३

नियुक्तीचे जिल्हे- रत्नागिरी, नंदुरबार व जालना.

जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी – उपलब्ध जागांची संख्या २

नियुक्तीचे जिल्हे- गोंदिया व रत्नागिरी.

जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (कृषी) – उपलब्ध जागांची संख्या ८

नियुक्तीचे जिल्हे- पालघर, ठाणे, रत्नागिरी, नंदुरबार, जालना, उस्मानाबाद, गोंदिया, सिंधुदुर्ग व चंद्रपूर.

जिल्हा व्यवस्थापक- उपजीविका (बिगरकृषी) – उपलब्ध जागांची संख्या ४

नियुक्तीचे जिल्हे- रत्नागिरी, सोलापूर, बीड व सिंधुदुर्ग.

जिल्हा व्यवस्थापक- एमआयएस – उपलब्ध जागांची संख्या २

नियुक्तीचे जिल्हे- पालघर, ठाणे व सिंधुदुर्ग.

जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशनन – उपलब्ध जागांची संख्या २

नियुक्तीचे जिल्हे- रत्नागिरी व बीड.

जिल्हा व्यवस्थापक – विपणन – उपलब्ध जागांची संख्या १२.

नियुक्तीचे जिल्हे- पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, नंदुरबार, जालना, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर.

कार्यालयीन अधीक्षक तथा जिल्हा समन्वयक – संपादणूक – उपलब्ध जागांची संख्या ५

नियुक्तीचे जिल्हे – पालघर- ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – वरील पदांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची जाहिरात पाहावी अथवा उमेदच्या www.jobs.msrlm.org किंवा www.umed.in या संकेत स्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१७ आहे.

उमेदअंतर्गत राज्यात तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील संधी

तालुका अभियान व्यवस्थापक – उपलब्ध जागांची संख्या ३८

नियुक्तीचे जिल्हे – रत्नागिरी, पालघर, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, बीड व सिंधुदुर्ग.

तालुका व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी – उपलब्ध जागांची संख्या ६९.

नियुक्तीचे जिल्हे – रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, सिंधुदुर्ग व ठाणे.

तालुका व्यवस्थापक – क्षमता बांधणी – उपलब्ध जागांची संख्या ३८.

नियुक्तीचे जिल्हे – रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, सिंधुदुर्ग, ठाणे व नाशिक.

तालुका व्यवस्थापक – उपजीविका – उपलब्ध जागांची संख्या ९०.

नियुक्तीचे जिल्हे – रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, सिंधुदुर्ग, ठाणे व नाशिक.

तालुका व्यवस्थापक – आर्थिक समावेशन – उपलब्ध जागांची संख्या ३६.

नियुक्तीचे जिल्हे – रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, सोलापूर, जालना, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व ठाणे.

तालुका व्यवस्थापक – एमआयएस व एमअ‍ॅण्डई – उपलब्ध जागांची संख्या ८५.

नियुक्तीचे जिल्हे – रत्नागिरी, पालघर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, सिंधुदुर्ग, ठाणे व नाशिक.

अधिक माहिती व तपशील – तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाशी संबंधित वरील जागांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची जाहिरात पाहावी अथवा उमेदच्या www.jobs.msrlm.org किंवा www.umed.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०१७ आहे.

विशेष सूचना- उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने व ११ महिने कालावधीसाठी करण्यात येईल व त्यादरम्यान त्यांना त्यांच्या पदानुसार एकत्रित मासिक वेतन देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:57 am

Web Title: job opportunity job issue 3
Next Stories
1 करिअरमंत्र
2 यूपीएससीची तयारी : भारत व शेजारील देश
3 समाजकल्याण विभागाच्या योजना
Just Now!
X