नॅशनल फर्टलिायझर्स लिमिटेड (एनएफएल) (भारत सरकारचा उपक्रम), नॉएडा, उत्तर प्रदेश (जाहिरात क्र. ०५/२०१७) आपल्या विविध कार्यालयांत/युनिट्समध्ये इंजिनीअरपदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ५४

१) केमिकल -२५ पदे.

२) मेकॅनिकल -१५ पदे,

३) इलेक्ट्रिकल – ६ पदे,

४) इन्स्ट्रमेन्टेशन – ४ पदे,

५) सिव्हिल – ४ पदे.

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ विकलांग – ५५% गुण). एक वर्षांचा कामाचा अनुभव. (११ वर्षांचा अनुभव असलेले डिप्लोमाधारकसुद्धा पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर, २०१७ रोजी ३० वष्रेपर्यंत.

अर्जाचे शुल्क – रु. ७००/- (अजा/अज/विकलांग/मा.स. यांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज www.nationalfertilizers.com या संकेतस्थळावर दि. १५ डिसेंबर, २०१७पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची िपट्रआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह एनएफएलच्या पत्त्यावर दि. २७ डिसेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील अशी पाठवावी.

बाल्मर लॉरी अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेड

(भारत सरकारचा अंगिकृत उपक्रम) नवी मुंबई, बडोदा, हैदराबाद, हरयाणा, चेन्नई इ. आस्थापनांवर ‘ज्युनियर ऑफिसर (ग्रुप-बी) ग्रेड-ओ१’च्या एकूण ४७ पदांची भरती.

पात्रता – १) इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, केमिकल, मेकॅनिकल या विषयांतील अभियांत्रिकी पदविकाधारक; पदवी (नॉन-इंजिनीअरिंग) (कोणतीही शाखा); बी.कॉम. २-३ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत. ज्युनियर ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज)- २ पदे.

पात्रता – हिंदी विषयात एम.ए. (पदवीत एक विषय इंग्रजी असावा.) किंवा इंग्लिश विषयात एम.ए. (पदवी/पदव्युत्तर पदवीला एक विषय हिंदी असावा.)

वयोमर्यादा – ३५ वष्रेपर्यंत.

वेतन सीटीसी – रु. ४ लाख प्रतिवर्ष (वेतनात सुधारणा होण्याची शक्यता).

परीक्षा शुल्क – रु. ५००/-  रु. ५०/- बँक चार्जेस (अजा/अज/विकलांग यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज http://www.balmerlawrie.com/pages/currentopening या संकेतस्थळावर दि. ९ डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.