07 March 2021

News Flash

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांना भोजनालयविषयक कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा.

भारतीय वायुसेनेअंतर्गत ओझर- नाशिक येथे भोजनालय कर्मचाऱ्यांच्या २ जागा -

 

* भारतीय वायुसेनेअंतर्गत ओझर- नाशिक येथे भोजनालय कर्मचाऱ्यांच्या २ जागा –

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांना भोजनालयविषयक कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ मार्च २०१७ च्या अंकातील भारतीय वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग, बेस रिपेअर डेपो, वायुसेवा केंद्र, ओझर, नाशिक- ४२२२२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१७.

* केंद्रीय कामगार आयुक्तालयांतर्गत कामगार कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या ३३ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१७.

* संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागात स्टोर्स ऑफिसरच्या ६ जागा –

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ ते ३१ मार्च २०१७ च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  अथवा http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१७.

*  भारतीय वायुसेनेअंतर्गत पुणे येथे कनिष्ठ कारकून म्हणून संधी –

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांनी संगणकीय पद्धतीसह इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग, बेस रिपेअर डेपो, भारतीय वायुसेना, डी’मेलो पेट्रोल पंपासमोर, चंदननगर, नगर रोड, पुणे या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१७.

*  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून संधी –

उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या http://www.iitb.ac.in/jobs.html’ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई, मुंबई- ४०००७६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१७.

* भारतीय वायुसेनेअंतर्गत मुंबई येथे बहुविध कर्मचाऱ्यांच्या २ जागा –

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांना कार्यालयीन सहकर्मचारी म्हणून १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडिंग ऑफिसर, मूव्हमेंट कंट्रोल युनिट, वायुसेना टर्मिनल, १ बी, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई- ४०००९९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१७.

*  ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनमध्ये कनिष्ठ भाषांतरकारांसाठी संधी –

अधिक माहिती व तपशिलासाठी ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या दूरध्वनी क्र. ०११- २६१३१५७६ वर संपर्क साधावा अथवा एआयसीटीईच्या www.aicte-india.org<bulletin<jobs  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख  १५ एप्रिल २०१७.

*  बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उद्योगात ग्राहक तक्रार निवारण विभागात सदस्य म्हणून संधी –अधिक माहिती व तपशिलासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उद्योगाच्या www.bestundertaking.com अथवा www.cgrfbest.org.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:54 am

Web Title: job opportunity job vacancies in india job vacancies recruitment employment opportunity
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षेनंतर..
2 वेगळय़ा वाटा : फ्रंट ऑफिसचा  थाट
3 करिअरमंत्र
Just Now!
X