नवोदय विद्यालय समिती (एचआरडी मंत्रालयअंतर्गत एक स्वायत्त संस्था) आपल्या मुख्यालय (एचक्यू)/८ प्रादेशिक कार्यालयात (आरओ) आणि त्याअंतर्गत जवाहर नवोदय असलेल्या विद्यालयात पुढील एकूण ५८३ पदांची भरती.

अ) एचक्यू /आरओसाठी (एकूण २४ पदे)

१) लोअर डिव्हिजन क्लर्क – १० पदे

(अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ७).

पात्रता -बारावी किमान ५०%  गुणांसह उत्तीर्ण.

३० श.प्र.मि. इंग्रजी किंवा २५ श.प्र.मि. हिंदी टायिपग स्पीड.

२) स्टेनोग्राफर – ६ पदे

(अजा – १, अज – ०, इमाव – ४, खुला – १).

पात्रता – बारावी उत्तीर्ण. ८० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड. ४० श.प्र.मि. इंग्रजी टायिपग स्पीड किंवा शॉर्टहँड स्पीड ६० श.प्र.मि. आणि ३० श.प्र.मि. हिंदी टायिपग स्पीड.

वयोमर्यादा – पद क्र. (१) आणि (२) साठी १८ ते २७ वष्रे.

३) हिंदी ट्रान्स्लेटर – ५ पदे (इमाव – १, खुला – ४).

पात्रता – हिंदी/इंग्रजीमधील पदव्युत्तर पदवी आणि यापकी इतर एका विषयात पदवी केलेली असावी किंवा हिंदी/ इंग्रजीमधील पदवी डिप्लोमा इन ट्रान्स्लेशन (हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदी भाषांतर. २ वर्षांचा अनुभव).

४) ऑडिट असिस्टंट – ३ पदे (इमाव – २, खुला -१).

पात्रता – बी.कॉम. उत्तीर्ण अकाउंट्सच्या कामाचा ३ वष्रे अनुभव.

वयोमर्यादा – १८-३० वष्रे.

पुणे प्रादेशिक कार्यालयातील अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयात भरती (एकूण ६५ पदे).

१) एलडीसी/स्टोअर कीपर – ४५ पदे (अजा – ३, अज – ४, इमाव – ९, खुला – २९).

पात्रता, वयोमर्यादा – पद क्र. (अ-१) प्रमाणे.

२) लॅब अटेंडंट – ४ पदे (खुला -४).

पात्रता -आठवी उत्तीर्ण. वयोमर्यादा – १८-३० वष्रे.

३) कॅटिरग असिस्टंट – ६ पदे (इमाव – ३, खुला – ३).

पात्रता – दहावी उत्तीर्ण. ३ वर्षांचा कॅटिरग डिप्लोमा किंवा बारावी उत्तीर्ण. एक वर्षांचा कॅटिरग डिप्लोमा.

४) फीमेल स्टाफ नर्स – १० पदे

(इमाव – ५, अज – २, खुला – ३).

पात्रता – बारावी उत्तीर्ण. ३ वर्षांचा नìसग डिप्लोमा किंवा बी.एस्सी. (नìसग) आणि इंडियन/स्टेट नìसग काउन्सिलकडे नाव रजिस्टर्ड असावे आणि दोन वर्षे कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा – पद क्र. २, ३ आणि ४ साठी ३५ वष्रेपर्यंत. सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादेत (इमाव – ३ वष्रे आणि अजा/अज – ५ वष्रेपर्यंत सूट).

निवड पद्धती – सर्व पदांसाठी संगणकावर १०० गुणांची लेखी परीक्षा.

कालावधी – १५० मिनिटे. लअर डिव्हिजन क्लर्क, एलडीसी/स्टोअर कीपर आणि स्टेनोग्राफर पदांसाठी स्किल टेस्ट घेतली जाईल जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल. चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह गुण दिले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्ज http://www.nvshq.org/uploads/1notice/Recruitment_NVS_Advertisement_Recruitment_2017_-1510648547.pdf  या संकेतस्थळावर दि. १३ डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

अर्जाचे शुल्क – स्टाफ नर्स, ऑडिट असिस्टंट, हिंदी ट्रान्स्लेटर पदांसाठी रु. १,०००/-, इतर पदांसाठी – रु. ७५०/- (अजा/अज/विकलांग/माजी सनिक यांना शुल्क माफ आहे.) वयोमर्यादा आणि पात्रतेसाठी ३१ ऑक्टोबर, २०१७ कट ऑफ डेट धरण्यात येईल. (पुणे प्रादेशिक विभागाने एलडीसी/स्टोअर कीपरच्या १९ पदांसाठी जाहिरात दि. २० डिसेंबर, २०१४ रोजी दिली होती (जी नंतर रद्द झाली होती). त्यानुसार अर्ज केलेले उमेदवार

दि. १ जानेवारी, २०१५ तारखेला असलेल्या पात्रतेनुसार आता नव्याने अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना नव्याने फी भरण्याची गरज नाही.)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., गुजरात रिफायनरी, वडोदरा (जाहिरात क्र. जेआर/०२/२०१७) अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारांची ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट- ४ (प्रोडक्शन)च्या ७ ट्रेनी पदांसाठी भरती.

पात्रता – केमिकल/रिफायनरी अँड पेट्रोलियम इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथ्समधील बी.एस्सी. (पात्रता परीक्षेत किमान ४०%  गुण आवश्यक) एक वर्ष कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १८ ते ३१ वष्रे.

लेखी परीक्षा – दि. २४ डिसेंबर, २०१७ रोजी होईल.

ऑनलाइन अर्ज www.iocrefrecruit.in या संकेतस्थळावर दि. २३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट आवश्यक त्या कागदपत्रांसह IOCL वडोदरा पत्त्यावर  दि. ४ डिसेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.