इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ४ जागांसाठी थेट मुलाखत

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इंस्टिटय़ूटच्या  http://www.tropmet.res.in/Careers या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- डायरेक्टर, इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, डॉ. होमी भाभा मार्ग, पाषाण, पुणे- ४११००८ येथे १५ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वा.

टाटा इंस्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, पुणे येथे टेक्निकल ट्रेनी (सिव्हिल)च्या २ जागा

अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, पुणेची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http://www.ncra.tifr.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, पुणे विद्यापीठ परिसर,  गणेशखिंड, पुणे ४११००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१७.

केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागात संशोधन अधिकारी (केमिकल) च्या ९ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in

अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१७.

नॅशनल सेंटर फॉर अँटाक्र्टिक अ‍ॅण्ड ओशन रिसर्च- गोवा येथे प्रोजेक्ट सायंटिस्टच्या १९ जागी

वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल सेंटर फॉर अँटाक्र्टिक अ‍ॅण्ड ओशन रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http://www.ncaor.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१७.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात अकाऊंटंटच्या १५ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची जाहिरात पाहावी अथवा मंडळाच्या http://www.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१७.

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, पुणे येथे अंशकालीन वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी

अर्जदार एमबीबीएस पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली टाटा इंस्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा इंस्टिटय़ूटच्या http://www.ncra.tifr.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, टाटा  इंस्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड, पुणे ४११००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१७.