*    केंद्र सरकार/राज्य सरकारमधील सारख्या (analogous) पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑब्झव्‍‌र्हेशन/डेप्युटेशन पद्धतीने सामील होण्याची संधी.

१)     ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर – कक/टेक (१३७ पदे) (ग्रेड पे – २,४००/-)

पात्रता – गणित आणि फिजिक्स विषयांसह बारावी उत्तीर्ण. रेडिओ टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशनमधील आयटीआय (अपेक्षित (डिझायरेबल) कौशल्य -HF/VHF कम्युनिकेशन सेटची देखभाल, हार्डवेअर देखभाल, इलेक्ट्रॉनिक सव्‍‌र्हेलन्स).

२) सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्स्पोर्ट)

(४६ पदे) – (ग्रेड पे – २,०००/-)

पात्रता – दहावी. एलएमव्ही लायसन्स. मोटर मेकॅनिझमचे ज्ञान. एक वर्षांचा अनुभव.

३) पर्सोनल असिस्टंट (१५ पदे)

(ग्रेड पे – रु. ४,६००/-)

४) ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर /ग्रेड- क

(मोटर ट्रान्स्पोर्ट) (११ पदे)

५) हलवाई कम कुक (१२ पदे) इ. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६ डिसेंबर, २०१७ च्या अंकात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज (दोन प्रती आणि आवश्यक कागदपत्रांसह) प्रॉपर चॅनल (खात्यामार्फत) दि. १३ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत पुढील पत्त्यावर पोहोचतील असे पाठवावेत. ‘जॉइंट डेप्युटी डायरेक्टर (जी), इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, ३५ एस्.पी. मार्ग, नवी दिल्ली – २१’

* मा शुल्क आयुक्तालय, न्यू कस्टम हाऊस, पणंबूर, मंगलूर – १० येथे मंगलूर कस्टम्सच्या मरिन विंगमध्ये पुढील पदांची भरती.

१) सीमन – २१ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, खुला – १२)

पात्रता – दहावी उत्तीर्ण, समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक बोटीवरील तीन वर्षांचा अनुभव. (मरिन र्मकटाईल डिपार्टमेंटने जारी केलेले ‘मेट ऑफ फिशिंग व्हेसल’ प्रमाणपत्रधारकांस प्राधान्य)

२) ग्रीसर – ९ पदे

(अजा – १, इमाव – २, खुला – ६)

पात्रता – दहावी उत्तीर्ण,  समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक बोटीवरील मशिनरी मेंटेनन्सचा अनुभव. (मरिन र्मकटाईल डिपार्टमेंटने दिलेले मच्छीमार बोटीवरील इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्रधारकास प्राधान्य)

पद क्र. (१) व (२) साठी वयोमर्यादा

१८ ते २५ वर्षे.

३) तांडेल – ३ पदे. (इमाव – १, खुला – २)

पात्रता – आठवी उत्तीर्ण. १० वर्षांचा समुद्रात जाणाऱ्या बोटींवरील कामाचा अनुभव. (प्राधान्य – इन लॅण्ड मास्टर फर्स्ट क्लास प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिस, दहावी उत्तीर्ण) वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे.

४) सीनियर डेक हँड – ३ पदे

अजा – १, खुला – २)

पात्रता – आठवी उत्तीर्ण, समुद्रात जाणाऱ्या बोटीवरील ५ वर्षांचा अनुभव (प्राधान्य – फिशरी ट्रेनिंग स्कूलचे प्रमाणपत्र, दहावी उत्तीर्ण) वयोमर्यादा – १८-३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत अजा/अज – ५ वर्षे, इमाव – ३ वर्षेपर्यंत सूट)

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि पोहण्याची स्पर्धा (बोर्डवरून उडी मारून १०० मी. पोहणे).

विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६ डिसेंबर, २०१७ च्या अंकात तसेच पुढील संकेतस्थळांवर मिळेल. http://www.cbec.gov.in आणि http://www.banglorecustoms.gov.in तसेच http://www.customsmanglore.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह  `The Additional Commissioner of Customs (Preventive), New Custom House,

Panambur, Manglore – 575 010′ या पत्त्यावर दि. १३ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत रजिस्टर्ड ए.डी. किंवा स्पीड पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत.

सुहास पाटील – suhassitaram@yahoo.com