इंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये डिप्लोमा इंजिनीअर्सना यांत्रिक ०२/२०१८ बॅच/कोर्ससाठी प्रवेश.

पात्रता – इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनमधील अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ५५% गुण.)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ ऑगस्ट १९९६ ते ३१ जुलै २००० दरम्यानचा असावा. (अजा/अजसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल.)

वेतन – दरमहा रु. २९,२००/-  यांत्रिक पे रु. ६,२००/-  डी.ए.  इतर भत्ते.

शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मार्च २०१८ दरम्यान लेखी परीक्षा द्यावी लागेल. (ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन आणि सामान्य ज्ञान रिझिनग अ‍ॅप्टिटय़ूड आणि इंग्लिश या विषयांवर आधारित प्रश्न.) लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी (ढाळ) द्यावी लागेल. त्यामध्ये १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटांत धावणे. २० उठाबशा आणि १० पुशअप्स कराव्या लागतील. लेखी परीक्षा मुंबई, चेन्नई, कोलकाता, नॉयडा या केंद्रांवर होईल. ऑनलाइन अर्ज http://www.joinindiancoastguard.gov.in  या संकेतस्थळावर दि. १९ जानेवारी, २०१८ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.

एनएमडीसी लिमिटेडमध्ये मेंटेनन्स असिस्टंटची भरती.

१) मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) ट्रेनी (आरएस – ०२) – एकूण ४५ पदे.

पात्रता – आयटीआय (वेल्डिंग/फिटिंग/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन.)  २) मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ट्रेनी (आरएस – ०२) – एकूण ४७ पदे. पात्रता – आयटीआय (इलेक्ट्रिकल) ट्रेड.

३) एचईएम मेक ग्रेड -३ ट्रेनी/एमसीओ ग्रेड-३ टेनी (आरएस – ०४) – एकूण ५ पदे.

पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा.

इष्ट पात्रता – उमेदवाराकडे एचएमव्ही ड्रायिव्हग लायसन्स असावे.

वयोमर्यादा – दि. ८ मे २०१५ रोजी १८ ते ३० वष्रे. कमाल वयोमर्यादा – इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रेपर्यंत. मेंटेनन्स असिस्टंट पदासाठी स्टायपेंड पहिल्या १२ महिन्यांसाठी रु. ११,०००/- प्रतिमाह आणि पुढील सहा महिन्यांसाठी रु. ११,५००/- पद क्र. ३ साठी रु. १२,०००/- आणि नंतर रु. १२,५००/-.

निवड पद्धती –  स्टेज-१ – लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ओएमआर शीटवर १०० गुणांची. (अ) विषयाचे ज्ञान (३० गुण), (ब) सामान्य ज्ञान (५० गुण), (क) न्यूमरिकल अ‍ॅण्ड रिझिनग अ‍ॅबिलिटी (२० गुण.) स्टेज-२- द्वितीय लेव्हल टेस्ट – ट्रेड टेस्ट/जॉब प्रोफिशियन्स टेस्ट – फक्त पात्रता स्वरूपाची. परीक्षा शुल्क – रु. १५०/-. अजा/अज/विकलांग यांना शुल्क माफ आहे.

ऑनलाइन अर्ज http://www.nmdc.co.in या संकेतस्थळावर दि. १७ जानेवारी, २०१८ पर्यंत करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना एनएमडीसी लिमिटेडच्या   बलादिला आर्यन ओअर माईन, किरान्दुल कॉम्प्लेक्स, जि. साऊथ बस्तर, दांतेवाडा (छत्तीसगड) या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल.