*    इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी) पुढील पदांची भरती.

(जाहिरात क्र. Rect/Admn-II /2017/11))

१) ज्युनियर मेकॅनिक (जॉब क्र. २४७) – ३ पदे (इमाव – २, यूआर – १) (विकलांग (एचएच) कर्ण दोष यांसाठी राखीव)

२) ज्युनियर मेकॅनिक (जॉब क्र. १६५) – ४ पदे. (अजा – १, यूआर – ३)

पद क्र. १ व २साठी. पात्रता – ३ वर्षांचा इंजिनीअिरग डिप्लोमा (कोणत्याही शाखेतील.) संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव किंवा आयटीआय (कोणतेही ट्रेड ) संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव.

३)     प्री-प्रायमरी टीचर (जॉब क्र. २२६) – १ पद (यूआर).

पात्रता – बारावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. नर्सरी टीचर एज्युकेशन/प्री-स्कूल एज्युकेशन/अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन किंवा समतुल्य डिप्लोमा (किमान २ वर्ष कालावधीचा) हिंदी/इंग्रजी माध्यमातून शिकविण्यातील क्षमता

५ वर्षांचा अनुभव किंवा पदवी उत्तीर्ण.

अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन किंवा समतुल्य डिप्लोमा (किमान १ वर्ष कालावधीचा.)

हिंदी/ इंग्रजीतून शिकविण्याची क्षमता. शिकविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

स्पेशल एज्युकेशनमधील किमान १ वर्षांचा डिप्लोमा.

वयोमर्यादा – २७ वर्षेपर्यंत

(इमाव – ३० वर्षेपर्यंत, अजा/अज – ३२ वर्षेपर्यंत.)

अर्जाचे शुल्क –

रु. ५०/- (अजा/अज/विकलांग यांना शुल्क माफ आहे)

वेतन – ज्युनियर मेकॅनिक पदासाठी रु. ३१,९२९/-;

प्री-प्रायमरी टीचर रु.४१४१२/-.

तीन वर्षांचे काँट्रॅक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास ज्युनियर मेकॅनिक उमेदवार ग्रेड-पे रु. २,८००/- वर आणि प्री-प्रायमरी टीचर पदावरील

उमेदवार ग्रेड पे रु. ४,२००/- वर नेमण्यास पात्र ठरतील.

निवड पद्धती – स्क्रीनिंग टेस्ट/ट्रेड टेस्ट/फिजिकल टेस्ट आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल. ऑनलाइन अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्कॅन कॉपीसहीत अपलोड करावेत. दि. १ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत  http://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या संकेतस्थळावर करावेत.

सुहास पाटील –suhassitaram@yahoo.com