आर्मी, नेव्हीमध्ये कूक आणि स्टुअर्ड्स म्हणून भरती होण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे कोस्रेस इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटिरग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम (भारत सरकारअंतर्गत एक स्वायत्त संस्था), दादर, (मुंबई- ४०० ०२८) शॉर्ट टर्म हॉस्पिटॅलिटी ट्रेिनग कोस्रेससाठी प्रवेश सूचना.हुनर से रोजगार तक प्रोग्रॅमअंतर्गत. 

(१) मल्टिक्विझिन कूक (विविध स्वयंपाकाच्या पद्धती) कालावधी- ५०० तास इन्स्टिटय़ूटमध्ये आणि २०० तास इंडस्ट्रीमध्ये.

(२) क्राफ्ट बेकर- कालावधी १७६ तास इन्स्टिटय़ूटमध्ये आणि ६४ तास इंडस्ट्रीमध्ये पद क्र. (१) व (२) साठी पात्रता- ८ वी उत्तीर्ण. स्टायपेंड रु. २,०००/- प्रतिमाह.

(३) एफ अँड बी सíव्हस- स्टुअर्ड.

पात्रता- १० वी उत्तीर्ण.

(४) रूम अटेंडंट (हाऊसकीपिंग). पात्रता- ५ वी उत्तीर्ण.

पद क्र. (३) व (४) साठी कोर्स कालावधी- ३०० तास इन्स्टिटय़ूटमध्ये आणि २०० तास इंडस्ट्रीमध्ये आणि स्टायपेंड रु. १,५००/- प्रतिमाह.

(५) फ्रंट ऑफिस असोसिएट. पात्रता- १२ वी उत्तीर्ण.

कालावधी- ३४० तास इन्स्टिटय़ूटमध्ये आणि २०० तास इंडस्ट्रीमध्ये. स्टायपेंड रु. १,५००/- प्रतिमाह. उच्च पात्रताधारक प्रवेशास पात्र नाहीत. सर्व पदांसाठी प्रशिक्षण विनामूल्य (फ्री) आहे.

वयोमर्यादा- १८ ते २८ वष्रे. उमेदवारांची निवड मुलाखतीतील कामगिरीवर आधारित.

स्टायपेंड मिळण्यासाठी किमान ८०% उपस्थिती आवश्यक.

अर्ज इन्स्टिटय़ूटच्या दादर येथील कार्यालयातून मिळविता येईल अथवा ६६६.्रँेू३ंल्ल.ी४ि  या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. प्रत्येक कोर्ससाठी किमान ३० उमेदवार असणे आवश्यक. पूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ९ ऑक्टोबर २०१७. ज्या उमेदवारांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करावयाची इच्छा असणाऱ्यांनी अर्ज करावेत.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल), डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, भारत सरकार, ‘मद्रास अ‍ॅटॉमिक पॉवर स्टेशन (एमएपीएस)’, कल्पक्कम, जि. कांचीपुरम, (तामिळनाडू- ६०३ १०२) येथे स्टायपेंडरी ट्रेनिज/ टेक्निशियन- बी (ग्रुप सी)च्या  ४१ पदांची भरती.

(३ पदे विकलांगांसाठी राखीव)

(ए) प्लँट ऑपरेटर – १४ पदे. पात्रता- १२ वी (सायन्स आणि मॅथ्स् विषयांत प्रत्येकी किमान ५०% गुण).

(बी) इलेक्ट्रिशियन- ६ पदे.

(सी) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रमेंट मेकॅनिक- ७ पदे.

(डी) फिटर- १४ पदे.

पात्रता- पद क्र. (बी), (सी), (डी) साठी १० वी किमान ५०% गुण विज्ञान आणि गणित विषयांत. संबंधित ट्रेडमधील २ वर्षांचा आयटीआयचा कोर्स उत्तीर्ण.

वयोमर्यादा- दि. २० ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते २४ वष्रे (इमाव- २७ वष्रे, अजा/अज- २९ वष्रे, विकलांग- ३४/ ३७/ ३९ वष्रेपर्यंत).

शारीरिक मापदंड – उंची- किमान १६० सें.मी. वजन- किमान ४५.५ कि. हायली डिझìवग उमेदवारांच्या बाबतीत शारीरिक मापदंड शिथिल केले जाऊ शकतात.

प्रशिक्षणाचा कालावधी – दोन वर्षांचा असेल. प्रशिक्षणादरम्यान दर महिन्याला पहिल्या वर्षी रु. ६,२००/- आणि दुसऱ्या वर्षी रु. ७,२००/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना ‘टेक्निशियन- बी’ या पदावर तनात केले जाईल.

वेतन – दरमहा रु. ३०,०००/- अंदाजे.

सुरुवातीला कल्पक्कम् येथे पोस्टिंग असेल. नंतर भारतभर बदली होऊ शकते. ऑनलाइन अर्ज ६६६.ल्लस्र््रू’.ल्ल्रू.्रल्ल  या संकेतस्थळावर दि. २० ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.