अंतरिक्ष विभाग, भारत सरकार, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) – आयसीआरबीमार्फत सायंटिस्ट /इंजिनीअर एससीपदांची भरती. (एकूण १०६ पदे)

१)     इलेक्ट्रॉनिक्स – ३२ पदे

२)     मेकॅनिकल – ४५ पदे

३)     कॉम्प्युटर सायन्स – २९ पदे.

पात्रता – सरासरी किमान ६५% गुणांसह (सीजीपीए ६.८४/१०) प्रथम वर्गातील संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी.

वयोमर्यादा – दि. २० फेब्रुवारी २०१८ रोजी ३५ वष्रेपर्यंत. (इमाव – ३८ वष्रे, अजा/अर्ज – ४० वष्रेपर्यंत)

निवड पद्धती – लेखी परीक्षा (दि. २२ एप्रिल २०१८ रोजी), मुलाखत. अंतिम निवड मुलाखतीतील गुणवत्तेनुसार. ऑनलाइन अर्ज http://www.isro.gov.in  या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये अनुसूचित जमाती उमेदवारांची नॉन एक्झिक्युटिव्ह पदांवर भरती.

१) स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर (एससी/टीओ) अर्ज – ५० पदे.

पात्रता – इंजिनीअरिंग डिप्लोमा (कोणत्याही शाखेतील) किंवा बी.एस्सी. (पीसीएम विषयांसह)

निवड पद्धती –  कॉम्प्युटरबेस्ड टेस्ट (सीबीटी)(वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) पेपर-१ आणि पेपर-२  सायको टेस्ट (पात्रता स्वरूपाची) मेडिकल टेस्ट.

२) मेंटेनर – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – अर्ज – २९ पदे.

पात्रता – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक किंवा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ अँड टीव्ही मेकॅनिक किंवा तत्सम आयटीआय कोर्स (एनसीव्हीटी/एससीव्हीटी)

निवड पद्धती – सीबीटी पेपर-१, मेडिकल टेस्ट.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते ३३ वष्रे.

सीबीटी पेपर-१ जनरल अवेअरनेस. जनरल अ‍ॅबिलिटी अँड रिझिनग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, जनरल इंग्लिश आणि नॉलेज ऑफ डिसिप्लिन/ट्रेड. १२० प्रश्न – १२० गुणांसाठी – वेळ ९० मिनिटे.

पेपर – २ – जनरल इंग्लिश लँग्वेज ६० प्रश्न/६० गुण – वेळ ४५ मिनिटे.

प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील.

ऑनलाइन अर्ज  www.delhimetrorail.com वर दि. २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com