‘सी डॅक’मध्ये पुणे येथे संगणकतज्ज्ञांसाठी संधी.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘सी डॅक’ पुणेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २५७०४१०० वर संपर्क साधावा अथवा कंपनीच्या http://www.cdac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०१७.

हाफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन, मुंबई येथे पशुवैद्यक अधिकारी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली हाफकीन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी, दूरध्वनी क्र. ०२२-२४१२९२४८ वर संपर्क साधावा अथवा हाफकीनच्या  http://vaccinehaffkine.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले व कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), हाफकीन बायो- फार्मास्युटिक कॉर्पोरेशन लिमिटेड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई- ४०००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०१७.

पवनहंस लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणासह हेलिकॉप्टरचे चालक म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी पवनहंसच्या दूरध्वनी क्र. ०२२- २६२६१७५३ वर संपर्क साधावा अथवा कंपनीच्या http://www.pawanhans.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज चीफ इन्स्ट्रक्टर, पवन हंस हेलिकॉप्टर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, जुहू विमानतळ, स्वामी विवेकानंद मार्ग, विलेपार्ले (प.),

मुंबई- ४०० ०५६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७.

डिफेन्स सायंटिफिक इन्फेर्मेशन अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन सेंटर, दिल्ली येथे माहिती व वाचनालय साहाय्यकांच्या ३० जागा-

अर्जदारांनी वाचनालय विज्ञान विषयातील पदवी अथवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० जून २०१७ च्या अंकातील डिफेन्स साइंटिफिक इन्फरमेशन अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन सेंटरची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, डिफेन्स साइंटिफिक इन्फरमेशन अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन सेंटर, मेटॅकॅफ हाऊस, दिल्ली- ११० ०५४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७.

इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद येथे रिसर्च असोसिएट म्हणून संधी-

अर्जदारांनी गणित वा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना शैक्षणिक संशोधनविषयक कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० जून २०१७ च्या अंकातील इंडियन स्कूल ऑफ माइन्सची जाहिरात पहावी. तपशिलवार अर्ज रजिस्ट्रार इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद ८२६००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७.

सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणे येथे भोजनालय आचाऱ्याची संधी-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व कॅटरिंगविषयक पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ जून २०१७ च्या अंकातील सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पावर रिसर्च स्टेशन, पुणेची जाहिरात पहावी अथवा रिसर्च स्टेशनच्या http://www.cwprs.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज चीफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पावर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणे ४११ ०२४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०१७.