*   भारतीय नौदलात युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम (यूईएस) जून, २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी पुढील ब्रँचेसमध्ये प्रवेश.

(१) एक्झिक्युटिव्ह ब्रँच –

(ए) जनरल सर्व्हिस (एक्स)

पात्रता – कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी.

(बी) एअर ट्रॅफिक कंट्रोलर – कोणत्याही शाखेतील बी.ई., दहावी/बारावीला सरासरी

६०% गुण,  इंग्रजी विषयात १२वीला ६० % गुण.

(सी) आयटी – आयटी/कॉम्प्युटर सायन्समधील अभियांत्रिकी पदवी.

(२) टेक्निकल ब्रँच –

(डी) इंजिनीअरिंग ब्रँच – मेकॅनिकल/मरिन/इन्स्ट्रमेंटेशन/प्रोडक्शन/ऑटोमोबाइल/मेटॅलर्जी/

मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट इ.मधील बी.ई.

(ई) इलेक्ट्रिकल ब्रँच – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इ. मधील बी.ई. (एफ) नेव्हल आíकटेक्चर – मेकॅनिकल/सिव्हिल/मेटॅलर्जी/

मरिन इंजिनीअरिंग/नेव्हल आर्किटेक्चर/शिप टेक्नॉलॉजी इ.मधील बी.ई.

(बी) आणि (एफ) एअर ट्रॅफिक कंट्रोलर, नेव्हल आर्किटेक्चरमधील पदे महिला/पुरुष यांच्यासाठी असून इतर पदे फक्त पुरुष उमेदवारांसाठीच आहेत. सर्व पदांसाठी गुणांची अट सरासरी किमान ६०% आहे.

वय – उमेदवाराचा जन्म

दि. २ जुलै १९९४ ते १ जुलै १९९७ दरम्यानचा असावा.

उंची – पुरुष – १५७ सें.मी.,

महिला – १५२ सें.मी.

कॅम्पस मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना, एसएसबी मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीनंतर सब-लेफ्टनंट पदावर आयएनएस, इझिमाला येथे २२ आठवडय़ांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. सीटीसी वेतन – दरमहा रु. ७२,४४४/- ते ८१,७००/-

एसएसबी डिसेंबर, २०१७ ते एप्रिल, २०१८ दरम्यान होईल.

ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in  या संकेतस्थळावर

दि. ३१ जुलै २०१७ पर्यंत करावेत.

* केसी, मिहद्रा एज्युकेशन ट्रस्टतर्फे महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्ती २०१७

ट्रस्टकडून ‘पॉलिटेक्निक्समधील पदविका अभ्यासक्रमासाठी’ दरवर्षी रु. १०,०००/- शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती ५५० गरजू आणि गुणवान विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंत दिली जाते.

पात्रतेच्या अटी –

दहावी/बारावी उत्तीर्ण.

बोर्डाच्या परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.

मुली, कमी उत्पन्न गटातील मुले, एक मुलगी, अपंग मुले व मुली आणि संरक्षण दलातील व्यक्तींची मुले/मुली यांना प्राधान्य.

अर्जाचा फॉर्म  http://www.kcmet.org/what-we-do-scholarship-Grants.aspx  या संकेतस्थळावर मिळेल. विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर ४ ऑगस्ट २०१७पर्यंत पाठवावा. ‘के.सी. महिन्द्रा एज्युकेशन ट्रस्ट, सेसिल कोर्ट, तिसरा मजला,

रिगल सिनेमाजवळ,महाकवी भूषण मार्ग, मुंबई – ४०० ००५’  निवडण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख, स्थान याची आगाऊ सूचना दिली जाईल.