इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आपल्या देशभरातील २० इन्स्टिटय़ूट्समध्ये मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट आणि फेलो प्रोग्रॅम्समधील प्रवेश देण्यासाठी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट, २०१७ (सीएटी २०१७) दि. २६ नोव्हेंबर, २०१७ रोजी घेणार आहे. (यात महाराष्ट्र राज्यात नव्याने सुरू झालेली ‘आयआयएम नागपूर’ मधील प्रवेश मिळविता येतील.

पात्रता – पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/विकलांग – ४५ % गुण).

रजिस्ट्रेशन फी – रु. १,८००/- (अजा/अज/विकलांग यांना रु. ९००/-).

परीक्षा केंद्रे – देशभरात एकूण १४० परीक्षा केंद्रे असतील. उमेदवारांनी आपल्या पसंतीची ४ केंद्रे निवडावयाची आहेत. ऑनलाइन रजिस्ट्रेशन दि. २० सप्टेंबर २०१७ पर्यंत करता येतील.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,गोवा येथे पुढील पदांची भरती.

(१) ज्युनियर सुपरिटेंडंट (५ पदे).

पात्रता – पदवी उत्तीर्ण  अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/रिक्रूटमेंट/ फायनान्स आणि अकाऊंट्स इ. मधील ४ वर्षांचा अनुभव.

(२) ज्युनियर असिस्टंट

(५ पदे) (यूआर – ४ पदे, इमाव – १ पद).

पात्रता – आर्ट्स/सायन्स/कॉमर्स/मॅनेजमेंटमधील पदवी. वयोमर्यादा – २७ वर्षे.

(३) ज्युनियर इंजिनिअर (१ सिव्हिल, १ इलेक्ट्रिकल), पदवी/पदविका. अनुभव.

(४) ज्युनियर लॅब असिस्टंट (२ पदे) (१ मेकॅनिकल / १ इलेक्ट्रिकल) अनुभव.

(५) ज्युनियर स्टाफ नर्स.

विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह ‘रिक्रूटमेंट सेल, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सेक्शन, मेन बिल्डींग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा (गोवा इंजिनिअरींग कॉलेज कॅम्पस, फामागुडी, पोंडा, गोवा – ४०३ ४०१)’ या पत्त्यावर दि. १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

(अर्जाचा नमुना http://www.iitgoa.ac.in या संकेतस्थळावरील /staffrecruit/php पुढील लिंकवर  उपलब्ध आहे.) अर्जासाठी शुल्क – रु. ५०/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ.)