13 December 2018

News Flash

नोकरीची संधी

लायब्रेरी सायन्समधील पदवी किंवा पदवी (कोणत्याही शाखेतील).

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

केंद्रीय विद्यालय संघटन (मुख्यालय), नवी दिल्लीमार्फत अधिकारी वर्ग, ग्रंथपाल आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकूण १,०१७ पदांची भरती.

१) लोवर डिव्हिजन क्लर्क – ५६१ पदे (यूआर – २८४, अजा – ८४, अज – ४२, इमाव – १५१).

पात्रता – बारावी उत्तीर्ण,  टायिपग स्पीड – इंग्रजी – ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी – ३० श.प्र.मि.

२) स्टेनोग्राफर (ग्रेड- २) – ३८ पदे (यूआर – १९, अजा – ६, अज – ३, इमाव – १०).

पात्रता – बारावी उत्तीर्ण,  स्कील टेस्ट (डिक्टेशन – १० मिनिटे – ८० श.प्र.मि./ ट्रान्सक्रिप्शन – इंग्रजी – ५० मिनिटे/ हिंदी – ६५ मिनिटे).

वयोमर्यादा – (दि. ३१ जानेवारी २०१८ रोजी) पद क्र. (१) व (२) साठी २७ वर्षेपर्यंत.

३) लायब्रेरियन – ग्रुप-बी – २१४ पदे (यूआर – १००, अजा – ३०, अज – ३०, इमाव – ५४).

पात्रता – लायब्रेरी सायन्समधील पदवी किंवा पदवी (कोणत्याही शाखेतील). एक वर्ष कालावधीची लायब्रेरी सायन्समधील पदविका.

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत.

४) हिंदी अनुवादक – ४ पदे (यूआर – २, अजा – १, इमाव – १).

पात्रता – हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला इंग्रजी विषय किंवा पदवी इंग्रजी माध्यमातून) किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला हिंदी विषय किंवा पदवी हिंदी माध्यमातून) किंवा पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) (पदवी हिंदी/ इंग्रजी माध्यमातून इंग्रजी/ हिंदी विषयांसह) किंवा पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) आणि हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदी भाषेत अनुवादन प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा)

वयोमर्यादा – २८ वर्षेपर्यंत.

५) अप्पर डिव्हिजन क्लर्क – १४६ पदे (यूआर – ७०, अजा – २४, अज – १३, इमाव – ३९).

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील). ३ वर्षांचा एलडीसीच्या कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत.

६) साहाय्यक – २७ पदे (यूआर – १६, अजा – ४, अज – २, इमाव – ५)

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील). ३ वर्षांचा यूडीसीच्या कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत.

७) साहाय्यक आयुक्त ग्रुप-ए – १३ पदे (१ पद विकलांग एचएचसाठी राखीव) (यूआर – ८, अजा – २, अज – १, इमाव – २).

पात्रता – पदव्युत्तर पदवी किमान ४५% गुणांसह बी.एड. पदवी ३ वर्षे प्रिन्सिपल पद धारण करणारे.

वयोमर्यादा – ५० वर्षेपर्यंत.

८) प्रशासनिक अधिकारी (ग्रुप-ए) – ७ पदे (यूआर – ४, अजा – १, इमाव – २).

पात्रता – पदवी. ३ वर्षांचा सुपरवायझरी पदाचा (ग्रेड-पे रु. ४,६००/-) अनुभव किंवा ६ वर्षांचा ग्रेड-पे रु. ४,२००/- पदावरील कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ४५ वर्षे.

९) उपायुक्त (ग्रुप-ए) – ४ पदे (यूआर – ३, इमाव – १).

पात्रता – दुसऱ्या वर्गातील पदव्युत्तर पदवी. बी.एड. पदवी. ५ वर्षे साहाय्यक आयुक्त/ ८ वर्षे एकत्रित साहाय्यक आयुक्त/ प्रिन्सिपल पदांवरील अनुभव.

वयोमर्यादा – ५० वर्षेपर्यंत.

१०) वित्त अधिकारी (ग्रुप-बी) – २ पदे (खुला – १, अज – १).

पात्रता – बी.कॉम. ५०% गुणांसह उत्तीर्ण, ४ वर्षांचा ऑडिट आणि अकाऊंट्समधील अनुभव किंवा एम.कॉम. किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. ऑडिट आणि अकाऊंट्समधील ३ वर्षांचा अनुभव किंवा सी.ए. (इंटर) किंवा आयसीडब्ल्यूए (इंटर) किंवा एमबीए (फायनान्स).

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – अजा/अज – ५ वर्षे, इमाव – ३ वर्षे, लायब्रेरीयन पदासाठी महिला उमेदवारांना – १० वर्षे, विकलांग – १०/१३/१५ वर्षे).

परीक्षा पद्धती – लेखी परीक्षा (कालावधी २ तास) – लोवर डिव्हिजन क्लर्क स्टेनोग्राफरसाठी

(१) पार्ट-१ – लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (४० गुण) – इंग्रजी/ हिंदी प्रत्येकी २० प्रश्न. पार्ट-२ – जनरल अवेअरनेस अ‍ॅण्ड कॉम्प्युटर लिटरसी (६० प्रश्न – ६० गुण). सामान्यज्ञान, लॉजिकल रिझिनग, कॉम्प्युटर लिटरसी आणि क्वांटिटेटिव्ह लिटरसी – प्रत्येकी १५ गुण.

(२) स्किल टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपात) – एलडीसी पदासाठी कॉम्प्युटरवर टायिपग टेस्ट (५० गुण) – इंग्रजी ३५ श.प्र.मि. किंवा िहदी ३० श.प्र.मि. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट – १०० गुण.

स्टेनोग्राफर पदासाठी – शॉर्टहँड टेस्ट ८० श.प्र.मि. वेग (५० गुण).

कॉम्प्युटरवर टायिपग टेस्ट (५० गुण). इंग्रजी – ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३५ श.प्र.मि.

कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट – १०० गुण.

लायब्रेरियन पदासाठी लेखी परीक्षा अवधी – ३ तास. एकूण गुण २०० (पार्ट- १ इंग्रजी/ हिंदी प्रत्येकी २० गुण, पार्ट- २ चालू घडामोडी, रिझिनग आणि न्यूमरिकल एबिलिटी प्रत्येकी ३० गुण आणि लायब्रेरी सायन्स – १०० गुण, मुलाखत – ६० गुण.)

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे इ.

परीक्षा दिनांक – केव्हीएसच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

अर्जाचे शुल्क – डेप्युटी कमिशनर, असिस्टंट कमिशनर, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांसाठी रु. १,२००/-, इतर पदांसाठी – रु. ७५०/- (अजा/ अज/ विकलांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) उमेदवार एकापेक्षा अधिक पदांना ऑनलाइन अर्ज करू शकतात. फक्त प्रत्येक पदासाठी वेगळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.    अर्ज करण्याची अंतिम तारीख – ऑनलाइन अर्ज  http://kvsangathan.nic.in/  या संकेतस्थळावर दि. ११ जानेवारी २०१८ रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येतील.

First Published on January 9, 2018 4:09 am

Web Title: jobs in india job vacancies in india job opportunities in india 8