*  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी शिपायांच्या २६ जागा –

अर्जदार बारावी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ नोव्हेंबर- १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा सुरक्षा दलाच्या  https://cisfrectt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१८.

*  केंद्रीय वित्त विभागात कनिष्ठ विधि सल्लागारांच्या ४ जागा- 

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय

लोकसेवा आयोगाच्या  http://www.upsc.gov.in अथवा  http://www.upsconline.nic.in. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१८.

*   वायुदलाच्या विविध विभागांतर्गत उमेदवारांच्या निवडीसाठी निवड परीक्षा- एएफसीएटी- २०१८.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा वायुदलाच्या  https://afcat.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०१८

*   युनियन बँक ऑफ इंडियामध्ये फॉरेक्स ऑफिसरच्या ५० जागा-

अर्जदार चांगल्या शैक्षणिक आलेखासह पदवीधर वा पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. एमबीए वा व्यवस्थापनविषयक पात्रताधारकांना प्राधान्य.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली

युनियन बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा युनियन बँकेच्या  https://www.unionbankofindia.co.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यामध्ये अबाऊट अस या लिंकवरून करिअर या लिंकवर गेल्यास संबंधित पदांची माहिती मिळेल.  संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१८.