स्टाफ सिलेक्शन कमिशन दि. १५ जून २०१७ रोजी  ‘कंबाइंड रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर्स, ज्यु. ट्रान्सलेटर्स, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर्स आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा २०१७’ घेणार.

पात्रता –

(१) हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी इंग्रजी विषयासह किंवा इंग्रजी माध्यमातील पदवी किंवा

(२) इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी हिंदी विषयासह किंवा हिंदी माध्यमातील पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी िहदी किंवा इंग्रजी माध्यमातून. ज्यु. हिंदी ट्रान्सलेटरसाठी हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवी.

प्राध्यापक पदासाठी – दोन वर्षांच्या हिंदी अध्यापनाचा अनुभव आवश्यक.

दि. १ जानेवारी २०१७ रोजी किमान पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत. विस्तृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ५ मे २०१७.

बँक ऑफ इंडियामध्ये एकूण ६७० पदांची भरती.

(१) ऑफिसर (क्रेडिट) (जेएमजीएस – १) (२७०) पदे (अजा – ४५, अज – ३७, इमाव – ७५, सामान्य – ११३). वयोमर्यादा – दि. १० एप्रिल २०१७  रोजी २१ ते ३० वष्रे.

(२) मॅनेजर (एमएमजीएस- २) (४०० पदे) (अजा -६८, अज – ३३, इमाव -१११, सामान्य – १८८). वयोमर्यादा – २३ ते ३५ वष्रे.

पात्रता – पदवी किमान ६०% गुणांसह (इमाव/अजा/अजसाठी ५५% गुण)  एमबीए/पीजीडीबीएम किंवा वाणिज्य/विज्ञान/अर्थशास्त्र विषयांतील पदव्युत्तर पदवी.

मॅनेजर पदासाठी अधिकारी म्हणून बँकेतील कामाचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

ऑनलाइन अर्ज http://www.bankofindia.co.in  या संकेतस्थळावर ‘करिअर ’लिंकमधून दि. ५ मे २०१७ पर्यंत करावेत.

 

केंद्रीय लोकसेवा आयोग सेंट्रल आर्मड् पोलीस फोस्रेसमध्ये ‘असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए)’ च्या एकूण १७९ पदांच्या भरतीसाठी दि. २३ जुल २०१७ रोजी ‘सेंट्रल आर्मड् पोलीस फोस्रेस (असिस्टंट कंमांडंट्स) एक्झामिनेशन २०१७’ घेणार.

रिक्त पदांचा तपशील – बीएसएफ- २८, सीआरपीएफ- ६५, सीआयएसएफ- २३, एसएसबी – ६३.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र.)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी २० ते २५ वष्रे (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे). शारीरिक मापदंड – उंची – पुरुष १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी.;

वजन – पुरुष – ५० कि., महिला – ४६ कि.; छाती – पुरुष -८१ ते ८६ सें.मी.

परीक्षा शुल्क – रु. २००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ).

निवड पद्धती – लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत व वैद्यकीय चाचणी.

ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर दि. ५ मे २०१७ (१८.००वाजेपर्यंत) करावेत.