News Flash

ग्रंथालय संचालनालय

ग्रंथालय निधीचा हिशोब ठेवून तिचा योग्य विनियोग करणे.

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ अन्वये, राज्यात सार्वजनिक ग्रंथालये व सार्वजनिक ग्रंथालये पद्धतीचे नियोजन, प्रस्थापना, परिरक्षण, संघटन व विकास साधण्यासाठी ग्रंथालय संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे.

उद्दिष्टे

  • राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे
  • नवीन सार्वजनिक ग्रंथालये प्रस्थापित करून त्यांचा विकास साधणे. सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जुने व दुर्मीळ ग्रंथ, नियतकालिके, हस्तलिखिते यांचा संग्रह करून तो जतन करणे.
  • ग्रंथालय विभागाचा वार्षिक अहवाल दरवर्षी राज्य ग्रंथालय परिषदेच्या मान्यतेनंतर शासनास सादर करणे.
  • सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथालय संघ यांना शासन मान्यता व तदर्थ, परिरक्षण, साधनसामग्री व अन्य सहाय्यक अनुदाने ग्रंथालय निधीतून मंजूर करणे.
  • ग्रंथालय निधीचा हिशोब ठेवून तिचा योग्य विनियोग करणे.
  • ग्रंथालय शास्त्राच्या प्रशिक्षण वर्गाच्या परीक्षा घेणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच राज्यात प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकांची एक ग्रंथसूची प्रतीवर्षी प्रसिद्ध करणे.

ग्रंथालयांना मिळणारे पुरस्कार

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार –

या योजनेंतर्गत राज्यातील मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांना सन १९८४-८५ पासून दरवर्षी प्रोत्साहनार्थ पुरस्कार दिले जातात. सन २००२-२००३ अ, ब, क, व ड वर्गातील प्रत्येकी दोन (एक शहरी व एक ग्रामीण) ग्रंथालयांची निवड करून त्यांना पुरस्कार दिले जातात.

  • डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार-

ग्रंथालय कायदा व ग्रंथालय संचालनालयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना पुरस्कार देण्याची योजना सन १९९४ पासून सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2017 12:26 am

Web Title: library directorate
Next Stories
1 करिअरमंत्र
2 नोकरीची संधी
3 एमपीएससी मंत्र  : इतिहासाचा अभ्यास
Just Now!
X