महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाऑनलाइन कार्यरत आहे. राज्यातील विविध शासकीय विभाग आणि नागरिकांना सुलभपणे घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याच्या कामी महाऑनलाइन प्रयत्न करीत आहे.

ऑनलाइन पद्धतीने सेवांचा लाभ

महाऑनलाइनच्या माध्यमातून २५ शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध आहेत. ऑनलाइन सेवाभरती, ऑनलाइन लॉटरी, नॅशनल पार्कसाठी ऑनलाइन तिकीट या आणि अशा अनेक सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो.

विविध विभागांची संकेतस्थळे

महाऑनलाइन सर्व शासकीय विभागांना साधी सोपी संकेतस्थळे विकसित करण्यापासून गुंतागुंतीची वेब अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्यापर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारचे साहाय्य देऊ करते. सर्व विभाग आणि नागरी संस्थांना एसएमएस गेटवे आणि पेमेंट गेटवेच्या सुविधा महाऑनलाइननेच उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाऑनलाइनअंतर्गत संग्राम केंद्र

ई पंचायत प्रकल्पांतर्गत विविध सुविधा अधिक सक्षमपणे नागरिकांपर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी राज्यातील सर्व ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि २७९०० ग्रामपंचायतींना डेस्कटॉप संगणक, प्रिंटर कम स्कॅनर मशीन आणि इंटनेट जोडणी अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशा सेवा प्रदान करणाऱ्या केंद्रांचे संग्राम अर्थात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र असे नामकरण करण्यात आले आहे.

मुख्य वैशिष्टय़े 

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व संग्राम केंद्रांना ‘सीएससी’ अर्थात ‘कॉमन सव्‍‌र्हिस सेंटर’चा तसेच महाऑनलाइनला ‘एससीए’चा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही केंद्रे पंचायत तसेच अन्य सीएससी सेवा देऊ करतात.
  • ‘सीएससी’प्रमाणे ही केंद्रेसुद्धा बीटूसी सेवा प्रदान करण्यास पात्र आहेत.
  • संग्राम केंद्रांच्या व्यापक संपर्कामुळे राज्यात वित्तीय समायोजनासाठी केंद्रचालकांना बँकिंग करस्पॉन्डन्ट्स म्हणूनही नियुक्त केले जात आहे.
  • सुमारे २००० संग्राम केंद्रे कायमस्वरूपी ‘यूआयडी’- आधार नोंदणी आणि अद्यतन केंद्रे म्हणून स्थापन करण्यात आली आहेत.

अधिक माहितीसाठी: https://www.mahaonline.gov.in/