News Flash

एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र

अनुभवाधारित आराखडा असलेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवणे.

उद्दिष्टे

 • एचआयव्ही व एड्सचे उच्चाटन. सर्वसमावेशक संवादातून विविध लोकांपर्यंत पोहोचणे.
 • कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर एचआयव्ही व एड्सच्या होणाऱ्या परिणामांचे व्यवस्थापन व निर्मूलन. बाधित कर्मचाऱ्यांची काळजी व त्यांना आधार.
 • अनुभवाधारित आराखडा असलेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
 • एचआयव्ही/ एड्सचा प्रसार आणि प्रादुर्भाव याबाबत नियमित पारदर्शी अंदाज देणे.

मूल्य आणि दृष्टिकोन

 • भारतातील प्रत्येक एचआयव्हीबाधित व्यक्तीला दर्जात्मक उपचार मिळतील आणि तेही प्रतिष्ठेने मिळतील, असे वातावरण निर्माण झाले पाहिजेत.
 • एचआयव्ही/ एड्स बाधितांवर उपचार, प्रतिबंध आणि त्यांना आधार देण्याचे काम मानवी हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे.
 • एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना समानतेने सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्रच्या वतीने यासाठी उपाययोजना करण्यात येतात.

कार्यपद्धती

 • लागण होण्याचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गटांबरोबर थेट संवाद साधणे आणि सर्वसाधारण लोकांबरोबरचा संवाद वाढवणे.
 • एचआयव्ही-एड्ससोबत जगणाऱ्या व्यक्तींना अधिकाधिक उपचार, आधार पुरवणे व त्यांची काळजी घेणे.
 • जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सेवा देणारी यंत्रणा अधिक बळकट करणे. सुविधा आणि मनुष्यबळ वाढवणे.
 • एचआयव्हीबाबत असलेली माहिती देणारी व्यवस्थापन यंत्रणा बळकट करणे.
 • महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ज्या राज्यांमध्ये एड्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, अशा राज्यांमध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षांत लागणीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी करून साथ आटोक्यात आणणे. तसेच जी राज्य धोकादायक पातळी गाठू शकतात अशा राज्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत कमी करून साथ नियंत्रणात ठेवणे.
 • अधिक माहितीसाठी : http://mahasacs.org/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=101&lang=mr

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:47 am

Web Title: maharashtra aids control society
Next Stories
1 नोकरीची संधी
2 करिअरमंत्र
3 एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग
Just Now!
X