महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा २०१७ अंतर्गत अभियांत्रिकी पात्रताधारक उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.
उपलब्ध जागांची संख्या व तपशील- एकूण उपलब्ध जागांची संख्या १९९ असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
अ- जलसंपदा विभागांतर्गत उपलब्ध संधी
साहाय्यक कार्यकारी अभियंता- स्थापत्य गट- अ श्रेणी १- एकूण जागा ६, यापैकी २ जागा अनुसूचित जातीच्या तर १ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असून ४ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
साहाय्यक अभियंता, स्थापत्य गट- अ श्रेणी १- एकूण जागा २१. यापैकी ५ जागा अनुसूचित जातीच्या, २ जागा अनुसूचित जमातीच्या, १ जागा विमुक्त जमातीच्या व २ जागा भटक्या जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ११ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
साहाय्यक अभियंता, स्थापत्य गट- ब, श्रेणी-२ – एकूण जागा ६५. यापैकी ८ जागा अनुसूचित जातीच्या, ४ जागा अनुसूचित जमातीच्या, २ जागा विमुक्त जातीच्या, ३ जागा भटक्या जमातीच्या तर १४ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असून ३३ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
ब- सार्वजनिक बांधकाम विभाग –
साहाय्यक कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट- अ, श्रेणी- १- उपलब्ध जागा २३. यापैकी ४ जागा अनुसूचित जातीच्या, १ जागा अनुसूचित जमातीच्या, १ जागा विमुक्त जातीच्या, २ जागा भटक्या जमातीच्या तर २ जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असून १२ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
साहाय्यक अभियंता, स्थापत्य गट- ब, श्रेणी- २- एकूण उपलब्ध जागा ८३, यापैकी १५ जागा अनुसूचित जातीच्या, ७ जागा अनुसूचित जमातीच्या, ४ जागा इतर मागासवर्गीय तर १ जागा विशेष मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी राखीव असून ४७ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा- २०१७ स्वरूपात ९ जुलै २०१७ रोजी मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ वा त्यानंतर आयोजित करण्यात येऊन त्याआधारे त्यांची पुढील निवड करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा- २०१७ या निवड परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०२२- २२७९५९०० अथवा २२६७०२१० वर संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या www.mpsc.gov.in अथवा http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०१७ आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 1:05 am