ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देशातील सुमारे २६० व्यवस्थापन  संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य ठरणाऱ्या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (एमएटी) या प्रवेश परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
शैक्षणिक अर्हता
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना ६ डिसेंबर २०१५ रोजी निर्धारित स्वरूपातील लेखी निवड परीक्षा अथवा १२ डिसेंबर २०१५ नंतर निर्धारित पद्धतीने व संगणकीय पद्धतीची प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागेल.
विद्यार्थ्यांची त्यांच्या पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व वर नमूद केलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणांकाच्या आधारे त्याला संबंधित शिक्षण संस्थेतील विशिष्ट व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून १,२०० रुपयांचा ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या नावे असणारा आणिनवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवावा अथवा हे प्रवेश शुल्क संगणकीय पद्धतीने ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन apps.aima.in/ matdecis या संकेतस्थळाद्वारे भरावे.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१५ असून प्रवेश अर्जाची प्रत २४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन, मॅनेजमेंट हाऊस, १४, इन्स्टिटय़ूशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठवावी.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या  http://www.amia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.