एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, मुंबई येथे खास महिलांसाठी व्यवस्थापनविषयक विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक महिला उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता – अर्जदार महिलांनी कुठल्याही विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करण्याचा कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असावा व त्या गेली दोन वर्षे सेवेत कार्यरत नसाव्यात.

निवडपद्धती – अर्जदार महिलांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही लेखी परीक्षा मुंबई येथे ६ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी, अनुभव व पात्रता आणि लेखी निवड परीक्षेतील गुणांची टक्केवारी यांच्या आधारे उमेदवारांना वरील अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमाची सुरुवात जानेवारी २०१८ मध्ये होईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एस. पी. जैन इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. ०२२- ६१४५४३८४/ ६१४५४३६३ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.spjimr.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, भवन्स कॅम्पस, कन्हैयालाल मुंशीनगर, दादाभाई रोड, अंधेरी (प.), मुंबई- ४०००५८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१७ आहे.

ज्या अनुभवी महिलांना व्यवस्थापन अभ्यासक्रमासह नव्याने करिअर सुरू करायचे असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.