फोर (फाऊंडेशन फॉर ऑर्गनायझेशनल रिसर्च अँड एज्युकेशन)स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली येथे ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रत्येकी दोन वर्षे कालावधीच्या विशेष व्यवस्थापन अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असावेत व त्यांनी

सीएटी- २०१७, एक्सएटी २०१८ अथवा जीएमएटी यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड पद्धती- अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून १९४७ रुपये संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या ँ३३स्र्://६६६.ऋ२े.ूं.्रल्ल/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट अधितय केंद्र, बी- १८, कुतुब इस्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली- ११००१६ या पत्त्यावर २२ डिसेंबर २०१७ पर्यंत पाठवावेत.