महाराष्ट्र शासनाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल विभागातर्फे एम – एचएमसीटी – म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या २०१७ – १८ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एमएएच – एम, एचएमसीटी – सीईटी : २०१७ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत –

आवश्यक शैक्षणिक पात्रता :- अर्जदारांनी हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी ते सर्वसाधारण गटातील असल्यास ५०%  गुणांसह (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ४५% उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते कॅटरिंग टेक्नॉलॉजी व हॉटेल मॅनेजमेंट विषयाच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

निवड पद्धती :- अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने २८ मे २०१७ रोजी घेण्यात येईल. या निवड परीक्षेत खाद्यान्न व सेवा, आदरातिथ्य, अन्न प्रक्रिया, इंग्रजी संभाषण व पर्यटन व्यवसायसारख्या विषयांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी १ तासाचा असेल व त्यामध्ये वरील विषयांशी संबंधित ५० प्रश्नांचा समावेश असेल.

प्रवेश परीक्षेचा निकाल ४ जून २०१७ रोजी घोषित करण्यात येऊन त्यानुसार अर्जदारांना वरील अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क :-  अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी १००० रु. (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :-  अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलच्या दूरध्वनी क्र. ०२२ -३०२३३४२० वर संपर्क साधावा अथवा http://www.dtemaharashtra.gov.in/approvedinstitues/StaticPages/DTEHomePage.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कार्यालयीन संपर्क :- महाराष्ट्र शासन – स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र

मुख्यालय :- ३०५, शासकीय तंत्रनिकेतन  इमारत, खरेवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.

विभागीय कार्यालय :- कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, तंत्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, मुंबई ४००००१.

हॉटेल मॅनेजमेंट  व कॅटरिंग टेक्नॉलॉजीमधील ज्या पदवीधरांना याच विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासह आपले करिअर घडवायचे असेल त्यांनी या संधीचा  अवश्य लाभ घ्यावा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत –  १२मे २०१७