मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे वैद्यकीय भरपाई विमा योजना. ‘प्रीमियम’ म्हणजे वैद्यकीय विमा योजनेचा हप्ता. हा हप्ता वार्षिक असतो. पुढच्या वर्षी तो नूतनीकरण केल्यावरच ‘मेडिक्लेम’ सुरू राहतो.
फॅमिली कव्हर
फॅमिली कव्हर म्हणजे कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय विमा संरक्षण. काही मेडिक्लेम हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात.
मेडिक्लेम लिमिट
मेडिक्लेम लिमिट म्हणजे एकूण किती पैसे मिळणार याबद्दलची मर्यादा. उदा. ठरावीक हप्त्याला मेडिक्लेममार्फत जास्तीतजास्त १ लाख रुपये खर्च व संरक्षण मिळू शकेल. हे याचे लिमिट (मर्यादा) झाले.
‘कॅशलेस’
रुग्णालयात सेवा घेतल्यानंतर रुग्णालयाला देयकाची रक्कम न देता विमा कंपनीने रुग्णालयाचे देयक भरणे, म्हणजेच ‘कॅशलेस’. अर्थात हे रुग्णालय त्या कंपनीच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांच्या यादीत असणे आवश्यक आहे. इतर रुग्णालयांमध्ये रुग्णाला स्वत: देयक देऊन त्याचा ‘क्लेम’ कंपनीकडे सादर करावा लागतो.
गटविमा
गटविमा म्हणजे एखाद्या संस्थेतील मोठय़ा समूहाने घेतलेली एकत्रित विमा योजना. संख्या मोठी असल्यामुळे यात विम्याचा हप्ता कमी पडतो.
अपघात विमा
अपघात झाल्यास उपचाराचा खर्च देणारा विमा. मृत्यू असल्यास याबद्दल अधिक भरपाई देणे म्हणजे ‘डेथ बेनिफिट’.
नो क्लेम बोनस
नो क्लेम बोनस म्हणजे मेडिक्लेम असून त्या वर्षी कोणतीही वैद्यकीय भरपाई न घेतल्याने मिळणारा बोनस. यामध्ये पुढील वर्षी विमा चालू ठेवताना काही सूट मिळते.
सरकारी विमा कंपन्या
भारतात चार राष्ट्रीय कंपन्या वैद्यकीय विमा देतात. यात न्यू इंडिया एश्युरन्स, जनरल इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय खाजगी विमा कंपन्या आहेत. या कंपन्यांनी भारतीय रिझव्र्ह बँकेकडे नोंद केलेली असते. या खाजगी कंपन्यांवर नियंत्रण करण्यासाठी एक केंद्रीय संस्थापण आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 1:08 am