आजच्या लेखामध्ये आपण ‘मध्ययुगीन भारत’ या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१७ मध्ये  एकूण १३ प्रश्न विचारण्यात आले आहेत. इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.

या घटकाचे स्वरूप

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?
Know About RBI History
भारतीय रिझर्व्ह बँक झाली ९० वर्षांची, बँकेची सुरुवात कशी झाली?

मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून झाली, असे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स ७५०-१२०० पर्यंत). या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े पाहावयास मिळतात, यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेली अरबांची व तुर्काची आक्रमणे होय. या कालखंडामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये प्रादेशिक राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला इत्यादी, पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादींच्या सत्ता होत्या.

यानंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्ताचा होता आणि दिल्ली सल्तनतला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतातील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुखत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतनंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतात स्थापन झाली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दख्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो.

याचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तिवात आलेल्या होत्या. यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता. तसेच यातील भक्ती चळवळ िहदू धर्माशी तर सुफी चळवळ इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना झालेली होती व याची स्थापना गुरुनानक यांनी केलेली होती.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

२०१२ मध्ये, सुफी चळवळीवर प्रश्न आलेला होता आणि हा प्रश्न ‘गूढ सुफिवाद पुढीलपकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात?’ असा होता. यासाठी पर्याय पुढीलप्रमाणे होते.

(MCQ प्रकारात मोडणारा प्रश्न)

१) ‘ध्यान आणि श्वासावर नियंत्रण’,

२) ‘एकांतात खडतर संन्याशी जीवन’

आणि ३) ‘धार्मिक गीताद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे’

२०१४ मध्ये, मध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते?

पर्याय

१) सनिक अधिकारी, २) ग्रामप्रमुख,

३) वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि ४) कारागार श्रेणीप्रमुख

२०१५ मध्ये बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले? (MCQ प्रकारात मोडणारा प्रश्न)

पर्याय –

१) उपखंडामध्ये दारुगोळा वापरण्यास सुरुवात झाली, २)स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनण्यास सुरुवात झाली आणि

३) तमूर राजवंशाची स्थापना करण्यात आली हे पर्याय दिलेले होते.

२०१६ मध्ये, मध्ययुगीन भारताच्या आíथक इतिहास संदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते?

पर्याय –

१) वेठबिगार, २) सनिक अधिकाऱ्यांना दिले जाणारे भूदान, ३)जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि ४)पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर असे चार पर्याय दिलेले होते.

२०१७ मध्ये, काकतीय राज्यामधील खालीलपकी कोणते महत्त्वाचे बंदर (Seaport) होते?

पर्याय –

१) काकिनाडा (Kakinada),

२) मोतुपल्ली (Motupalli),

३) मसुलीपत्तनम  (Masulipatanam/ Machalipatnam)

४)नेल्लूरू (Nelluru)

उपरोक्त प्रश्न या घटकावर विचारले जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.  या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो, यामध्ये  Our past part II इयत्ता सातवी आणि इयत्ता बारावीचे Themes in Indian History part- II  ही पुस्तके अभ्यासावीत आणि याच्या जोडीला सतीश चंद्रलिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे जेणेकरून या घटकाची योग्य परीक्षाभिमुख तयारी आपणाला करता येते. या पुढील लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाचा आढावा घेणार आहोत.