प्रशासन व्यवस्थेतील कामाची जबाबदारी आणि स्वरूपानुसार वर्ग १ – २, गट ब, गट क किंवा राजपत्रित, अराजपत्रित ही अधिकाऱ्यांची उतरंड, व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. ज्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात, त्यांची रचना, जबाबदारी, कार्ये लक्षात घेऊन त्यांसाठी अधिकारी, कर्मचारी निवडण्यासाठी परीक्षा पद्धत ठरवली जाते. म्हणूनच राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत बरेच समान घटक असूनही एकूण परीक्षा प्रक्रिया, अभ्यासक्रमाची रचना आणि प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न यांत फरक असतो.

दुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या वेगवेगळ्या विभागांमधील गट-क सेवांसाठीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे पहिले वर्ष आहे. उपलब्ध जागांची संख्याही चांगली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा एक संधी आहे. त्यामुळे तयारीमध्ये गांभीर्य आवश्यक आहे. संयुक्त पूर्व परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे. तसेच अभ्यासक्रमांमध्येही काही बदल आहेत त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम जास्त आहे. बहुतांश उमेदवारांचा संभ्रम पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेच्या काठीण्य पातळी बद्दल आहे.

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन करताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप समजून त्यांचे विश्लेषण करणे ही मूलभूत पायरी असते. पण गट क पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे. नव्या योजनेनुसार लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांच्या पूर्वपरीक्षेतील मराठी व इंग्रजी हा भाग मुख्य परीक्षेमध्ये टाकण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमाचा सामान्य क्षमता चाचणीचा भाग पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या सामान्य अध्ययन घटकाच्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षांमध्ये दुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न पाहू.

१. सन २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या जयंतीपासून करण्यात आली?

१)महात्मा गांधी २) पं.जवाहरलाल नेहरू    ३) सरदार वल्लभभाई पटेल ४) दादाभाई नौरोजी

२. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले?

१)खोल खोल पाणी     २)अश्वमेध       ३) माझं काय चुकलं?   ४)अग्निदिव्य

३. नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्डस यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी मिळाले होते?

१) टेस्ट टय़ूब बेबीसंदर्भातील

२) हृदय प्रत्यारोपण

३) किडनी प्रत्यारोपण     ४)यकृत प्रत्यारोपण

४. संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?

१)पंडित नेहरू   २) वल्लभभाई पटेल     ३) डॉ. राजेंद्र प्रसाद      ४) डॉ. आंबेडकर

५. ग्रामसभेचे सदस्य कोण असतात?

१) ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य   २) १८वर्षे पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती

३) गावातील नोंदणी झालेले मतदार       ४) सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य

६. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?

१)२३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद        २) २३ तास ५५ मिनिटे ५९.०९ सेकंद

३) २३तास ५५ मिनिटे ४९.०९ सेकंद       ४) २३ तास ५६ मिनिटे ०.०९ सेकंद

७. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्य़ाची सीमा लागत नाही?

१) चंद्रपूर २) यवतमाळ ३) गोंदिया ४)नांदेड

८. ———- हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु. के. येथे इंजिनीअिरगचे शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश घेतला.

१) पांडुरंग महादेव बापट

२) अच्युत बळवंतराव कोल्हटकर

३) विष्णू गणेश पिंगळे

४) श्यामजी कृष्ण वर्मा

९. शाहू छत्रपतींनी सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू?  केलेल्या वसतिगृहाचे नाव काय?

१)दिगंबर जैन बोर्डिंग २) वीरशैव लिंगायत वसतिगृह  ३)व्हिक्टोरिया मराठा बोìडग     ४) ढोर चांभार बोर्डीग

१०. रिझव्‍‌र्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत  ———- चा समावेश होतो.

१) खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची विक्री    २) बँक रेट (व्याज दर)

३) राखीव निधीचे बदलते प्रमाण

४) वरीलपैकी सर्व

११.जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर होते..

१) गतिज ऊर्जा —- स्थितिज ऊर्जा —विद्युत ऊर्जा

२) स्थितिज ऊर्जा — गतिज ऊर्जा—– विद्युत ऊर्जा

३) विद्युत ऊर्जा — स्थितिज ऊर्जा —- गतिज ऊर्जा

४) विद्युत ऊर्जा — गतिज ऊर्जा —- स्थितिज ऊर्जा

तिन्ही पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील हे प्रातिनिधीक प्रश्न आहेत. बारकाईने विश्लेषण केल्यावर लक्षात येते की राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान व अर्थव्यवस्था या घटक विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. इतिहासामध्ये तथ्यात्मक व्यक्तींवर आधारित प्रश्न विचारले आहेत.

चालू घडामोडींसह सर्वच घटकांवर तथ्यात्मक माहिती विचारणारे प्रश्न आले आहेत.

जुन्या पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून नव्या पॅटर्नसाठीच्या प्रश्नांचे अपेक्षित स्वरूप समजून घेणे बरेच वेळखाऊ काम आहे. दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठीच्या पूर्व परीक्षांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करुन त्याआधारे राष्ट्रचेतना प्रकाशनाच्या ‘महाराष्ट्र गट क सेवा अभ्यासप्रश्नपत्रिका’ या पुस्तकामध्ये अभ्यास प्रश्नपत्रिका संपादित केलेल्या आहेत.  त्यांचा सराव  व अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होईल.