वसुंधरा भोपळे

मागील लेखांपासून गट क सेवांच्या मुख्य परीक्षेबाबतच चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित केले आहे. गट ब सेवांच्या मुख्य परीक्षा या महिन्यापासून सुरू झाल्या आहेत आणि या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पुढील पेपर्सच्या तयारीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे गट क सेवांसाठीच्या तयारीच्या दरम्यान गट ब सेवांच्या झालेल्या पेपर्सचे विश्लेषण तो तो पेपर झाल्यावर देण्यात येईल. अशा प्रकारे गट ब आणि क यांच्या मुख्य परीक्षा समांतरपणे होत असल्याने त्यांच्या बाबतची चर्चाही या स्तंभातून समांतरपणे करण्यात येईल.

An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
administrative services
आकांक्षांची परीक्षा..
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

गेल्या महिन्यात ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदासाठीच्या मुख्य परीक्षेतील पदनिहाय सामान्य अध्ययन पेपर झाला आणि येत्या २० ऑक्टोबरला ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी आणि २७ ऑक्टोबरला ‘सहायक कक्ष अधिकारी’ पदासाठी स्वतंत्र सामान्य अध्ययन पेपर प्रस्तावित आहेत. आजच्या लेखात आपण पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या झालेल्या पेपरचा आढावा घेऊयात.

अभ्यासक्रमातील उपघटक आणि त्यावरील प्रश्नांचे विश्लेषण

*    बुद्धिमत्ता चाचणी – या घटकावर तर्क अनुमान, विधान आणि युक्तिवाद, आलेखावर आधारित माहितीचे आकलन, अक्षरमाला, दिशाज्ञान, अंकगणित आणि कुट प्रश्न, कॅलेंडरवर आधारित प्रश्न, सांकेतिक प्रणालीवर आधारित प्रश्न, माहितीचे आकलन, गटात न बसणाऱ्या आकृतीच्या बदली आकृती व नफा तोटा या घटकांवर एकूण १५ प्रश्न विचारले गेलेत. या प्रश्नांची काठीण्यपातळी मात्र नेहमीपेक्षा वाढलेली दिसून येते.

*    महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्रातील जिल्हानिहाय साक्षरता दर, जिल्हे आणि जलसिंचन योजना, खनिजे आणि उत्पत्तिस्थान, नदी आणि तिच्या उपनद्या, मृदा आणि मृदेतील घटक, महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील गेल्या दशकात झालेला बदल, महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील अनुसूचित जाती आणि जमातींचे प्रमाण, जिल्हे आणि लोह खनिज उत्पादन ठिकाणांच्या जोडय़ा, वनांचे प्रकार आणि स्थानिक वृक्ष, तसेच २०११च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा या घटकांवर एकूण १० प्रश्न विचारले गेलेत. या प्रश्नांची काठीण्यपातळी सारखीच वस्तुनिष्ठतेकडे झुकणारी आहे.

*  महाराष्ट्राचा इतिहास – या विभागात शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेतील सहभागी नेते, सत्यशोधक चळवळीच्या धर्तीवरील बुलढाण्यातील चळवळ आणि तिचे नेतृत्व, महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांच्याशी संबंधित संस्था, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासाठी इम्पिरियल कौन्सिलमध्ये पहिले विधेयक मांडणारी व्यक्ती, वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावे, डेक्कन सभेचे स्थापनाकार, फैजपूर काँग्रेस अधिवेशनातील सहभागी स्त्रियांना प्रशिक्षण देणारी प्रशिक्षक, टिळकांची अटक आणि त्यांच्यावरील आरोप, अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष या घटकांवर एकूण १० प्रश्न विचारण्यात आले आहेत. एकंदरीत या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे कार्य यावर विचारलेले दिसून येतात.

*   भारतीय राज्यघटना – या घटकावर राज्य मंत्रिमंडळ पद्धतीची प्रमुख वैशिष्टय़े, राज्य नीतीची मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित कलमे, विधान परिषदेतील सदस्य संख्या आणि त्यासंदर्भातील नियम, घटना समितीचे कार्य, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या पात्रतेचे निकष, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आणि सदस्य, मूलभूत हक्क आणि त्यांची वैशिष्टय़े, धर्मनिरपेक्षता आणि तिची घटनेतील व्याख्या, समानतेच्या अधिकारासंबंधित कलमे, राज्यघटनेनुसार गणराज्याचा अर्थ या उपघटकांवर एकूण १० प्रश्न विचारण्यात आले आहेत.

*  मानवी हक्क व जबाबदाऱ्या – यामध्ये स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००५ नुसार संरक्षण अधिकाऱ्याच्या कर्तव्य संबंधित कलम, राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाच्या अध्यक्षांच्या नेमणुकीचे अधिकार आणि तरतुदी, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ मधील जिल्हा न्यायालयासाठीची तरतूद, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील प्रकरणे आणि कलमांची संख्या तसेच या कायद्यान्वये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणुकीचे निकष आणि या कायद्यानुसार निर्देशित दंड, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात, शोषणाविरुद्धचे अधिकार आणि त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील कलमे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ आणि त्यातील तरतुदी, मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्यातील कलमांचा भारतीय राज्यघटनेतील पडसाद, हुंडाबंदी अधिनियमानुसार असलेली शिक्षेची तरतूद या उपघटकांवर एकूण १५ प्रश्न विचारले आहेत.

*  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ – या घटकावर १० प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये कायद्यातील प्रकरणे, त्यातील गुन्हा व शिक्षेसंबंधी तरतूद, तडीपारीच्या आदेशासाठीच्या तरतुदी आणि अधिकार, त्यातील अपवाद, पोलिसांची कर्तव्ये आणि अधिकार, महत्त्वाची कलमे आणि त्यांचे विषय, पोलीस नियंत्रण आणि त्यासाठी असणाऱ्या संस्थात्मक तरतुदी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आधारित प्रश्नांचा समावेश आहे.

* भारतीय दंड संहिता १८६० – या घटकावर १० प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेत समाविष्ट गुन्हे आणि त्यासाठी असणाऱ्या शिक्षा आणि अपवाद या संबंधित कलमे आणि तरतुदी व महत्त्वाच्या व्याख्या संबंधित महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश आहे.

* फौजदारी प्रक्रिया संहिता – १९७३– या घटकावर १० प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेतील विविध कलमे, आरोपीच्या वैद्यकीय तपासण्या आणि त्यासंदर्भातील पोलिसांचे अधिकार, प्रथम माहिती अहवाल तयार करण्याच्या तरतुदी, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये व अधिकार, गुन्हेगारांना अटक करण्याचे अधिकार आणि संबंधित तरतुदींची कलमे या महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश आहे.

*    भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act ryxs)- या घटकावर १० प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये कायद्याचे अंमलबजावणी क्षेत्र, महत्त्वाची कलमे आणि त्यातील तरतुदी; त्यानुसार करावयाची कारवाई या महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश आहे.