मागील अंकात आपण महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम याची माहिती करून घेतली. आज आपण २०१४ व २०१६ मधील मुख्य परीक्षा पेपर क्र. १ (सामान्य अध्ययन) व पेपर क्र. २

(सामान्य विज्ञान व निसर्ग संवर्धन) यांतील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू.

* मुख्य परीक्षेचे स्वरूप

*  मुख्य परीक्षा – ४०० गुण

*   प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन

१. सामान्य अध्ययन

२. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन

परीक्षा योजना

car03

 

वरील विश्लेषणावरून असे दिसते की, पेपर क्र. १ मधील इतिहास या घटकात समाजसुधारकांची काय्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारकांची विधाने, ब्रिटिश काळातील महत्त्वाचे कायदे व तरतुदी. भूगोल या घटकात प्रामुख्याने महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या उपघटकांवर भर देण्यात आला आहे. तसेच जगाचा भूगोल, भूगोलातील मूलभूत संकल्पना, पर्वत, पठारे, मृदा, प्राकृतिक विभाग यांचाही अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. राज्यशास्त्र या घटकात भारताच्या संविधानातील कलमे, तरतुदी, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, तज्ज्ञांची मते, जोडय़ा लावणे, कालखंड चढता उतरता क्रम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. अर्थशास्त्र व सामाजिक विकास या घटकात अर्थशास्त्रातील मूलभूत संज्ञा व संकल्पना, शासकीय धोरणे, योजना, िलगगुणोत्तर, कृषी, उद्योग व सेवा यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

पेपर २ चे विश्लेषण करायचे झाल्यास विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की, २०१४ व २०१६ मध्ये सामान्य विज्ञान (जनरल सायन्स) आणि फॉरेस्ट्री या उपघटकांवर आयोगाने विशेष भर दिलेला आहे. सामान्य विज्ञान या घटकामध्ये ध्वनी, उष्णता, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, पेशी, ऊती, सजीवांचे वर्गीकरण, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, सजीवांचे जीवनप्रक्रिया रोग आणि विकार, सूक्ष्मजीव या उपघटकांवर प्रश्न विचारलेले आहेत. फॉरेस्ट्री हा घटक संबंधित पदांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित असल्यामुळे आयोगाने या घटकातील प्रश्नांचा दर्जा उच्च स्वरूपाचा ठेवल्याचे दिसते. हा घटक अभ्यासकांना प्राथमिक ते दर्जेदार पुस्तके असा अभ्यासाचा क्रम ठेवावा.

निसर्ग संवर्धन (नेचर कन्झर्वेशन) आणि पर्यावरणीय व्यवस्था या घटकात मृदेचे गुणधर्म, प्रक्रिया जमिनीची धूप, वनांची भूमिका, पर्यावरण प्रदूषण, शासननिर्णय, धोरणे, कायदे, जैवविविधता, वन्यपशू – वनस्पती प्रजाती त्यांना होणारे रोग, पर्यावरणीय समस्या यांच्या अभ्यासावर भर द्यावा.

संदर्भसूची

पेपर १

इतिहास

राज्य परीक्षा मंडळाची ५, ८, ११वीची पुस्तके

आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर व बेल्हेकर

महाराष्ट्राचा इतिहास – कठारे, गाठाळ

भूगोल

राज्य परीक्षा मंडळाची ६वी ते १२वीची पुस्तके

जिओग्राफी थ्रू मॅप – के. सिद्धार्थ

महाराष्ट्राचा भूगोल – सवदी, खतीब.

राज्यशास्त्र

इडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत, राज्य परीक्षा मंडळाची ११वी, १२वीची पुस्तके

*   अर्थशास्त्र

इंडियन इकॉनॉमी – रमेश सिंग

भारताचा व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल

पेपर २

१. सामान्य विज्ञान

एन.सी.ई.आर.टी.ची – आठवी ते  दहावी राज्य परीक्षा मंडळाची आठवी ते दहावीची पुस्तके

समग्र सामान्य विज्ञान – नवनाथ जाधव (के. सागर प्रकाशन)

२. निसर्ग संवर्धन

१. लुकेन्स जनरल स्टडीज   (इकॉलॉजी आणि पर्यावरण)

२. भूगोल आणि पर्यावरण – सवदी

३. शंकर आ.ए.एस. (एन्हॉयरॉन्मेंट),

४. ई. बरुचा (पर्यावरण)

५. आय.सी.एस.ई.  (नववी आणि दहावीची  पर्यावरणाची पुस्तके)

६. फॉरेस्ट्री – अँटोनी राज आणि लाल

७. इंडियन फॉरेस्ट्री – मनिकंदन आणि प्रभू

८. प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी

९. कृषीविषयक – के. सागर

१०. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – के. सागर

११. राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रिकल्चर  आणि टेक्नॉलॉजीची ११वी, १२वीची पुस्तके

महेश कोगे