राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे देशांतर्गत उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय विषयातील एमडी- एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २०१७ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रतावजा प्रवेश परीक्षा नीट- पीजी २०१७(NEET) या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

*  आवश्यक शैक्षणिक पात्रता- नीट – २०१७ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी इंडियन मेडिकल कौंसिल कायद्यानुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय वा संस्थेतील एमबीबीएस पदवीधर, तात्पुरती एमबीबीएस प्रमाणपत्रधारक विद्यार्थी, एमबीबीएसचे कायमस्वरूपी किंवा तात्पुरते परतावा नोंदणी प्रमाणपत्रधारक किंवा इंडियन कौंसिल ऑफ इंडिया/ स्टेट मेडिकल कौंसिलतर्फे पारित समकक्ष पात्रता प्रमाणपत्र आणि एक वर्षांची इंटर्नशीप उमेदवारी पूर्ण केलेले अथवा अशा प्रकारची उमेदवारी ३१ मार्च २०१७ पूर्वी पूर्ण करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

*  प्रक्रिया- ‘नीट पीजी- २०१७’ ही प्रवेश पात्रता परीक्षा ५ ते १३ डिसेंबर २०१६ च्या दरम्यान देशांतर्गत ४१ शहरांमध्ये आयोजित केली जाईल.

* परीक्षा शुल्क : अर्जदार विद्याथी सामान्य/ ओबीसी गटातील असल्यास त्यांनी ३७५० रुपये, अनुसूचित जातीजमातींच्या वा शारीरिकदृष्टय़ा अपंग उमेदवारांची २७५० रुपये क्रेडिट कार्ड/ डेबिटकार्ड अथवा ऑनलाइन बँकिंगद्वारा करणे आवश्यक आहे.

*  अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- ‘नीट पीजी- २०१७’ द्वारे प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी कार्यालयीन वेळात टोल फ्री स्वरूपाच्या उमेदवार सहाय्यता क्र. १८००१११७०० वर संपर्क साधावा अथवा राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या http://www.nbe.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

*   अर्ज करण्याची  शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१६ आहे.

दत्तात्रय आंबुलकर