केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीतर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नॅशनल हॉस्पिटॅलिटी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच एनएचटीईटी मार्च २०१८ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. बारावीनंतर हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या विषयातील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अथवा हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

विशेष सूचना – जे उमेदवार वरील पात्रता परीक्षांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – अर्जदारांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर व संगणकीय पद्धतीने घेण्यात येईल व त्याआधारे त्यांची देशांतर्गत ५९ शैक्षणिक संस्थांमध्ये असिस्टंट लेक्चरर वा टीचिंग असोसिएट या पदासाठी पात्रताधारक म्हणून निवड करण्यात येईल. वरील संगणकीय पात्रता परीक्षा देशातील निर्धारित १६ शहरांमध्ये घेण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जानेवारी २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली एनएचटीईटी मार्च २०१८ ची जाहिरात पाहावी अथवा काउन्सिलच्या www.thims.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१८ आहे.