23 January 2018

News Flash

नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनची फेलोशिप

योजनेअंतर्गत उपलब्ध फेलोशिपची संख्या ७५ आहे.

दत्तात्रय आंबुलकर | Updated: October 7, 2017 2:26 AM

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडियामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

उपलब्ध जागांची संख्या- योजनेअंतर्गत उपलब्ध फेलोशिपची संख्या ७५ आहे.

आवश्यक पात्रता व अनुभव- अर्जदार उमेदवारांनी जीव विज्ञान, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, वैद्यक विज्ञान, आयुर्वेद, रसानयशास्त्र, पशू-विज्ञान, उत्पादन व औद्योगिक आरेखन, व्यवसाय विकास, उद्योजकता, जन संवाद, पत्रकारिता, ग्राफिक डिझाइन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, बौद्धिक क्षमता अधिकार यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित विषयात काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.

विशेष सूचना- वर नमूद केलेल्या विषयांमध्ये संशोधनपर पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा- अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

फेलोशिपची रक्कम- योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इनोव्हेशन फेलोशिप म्हणून दरमहा ६०,००० रु.ची फेलोशिप देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडियाची जाहिरात पाहावी अथवा नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या http://nif.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी  http://nif.org.in/advtno042017  ही वेबलिंक पाहावी. अथवा फाउंडेशनच्या Jobs@nifindia.org या ई-मेलला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डायरेक्टर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, इंडिया, ग्रामभारती, अमरापूर, यहुदी रोड, गांधीनगर- ३८२६५० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१७ आहे.

First Published on October 7, 2017 2:26 am

Web Title: national innovation foundation fellowship
  1. No Comments.