23 November 2017

News Flash

नर्सिगविषयक अभ्यासक्रम

पदवी व पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिग हा पदविका अभ्यासक्रम यांचा समावेश आहे.

दत्तात्रय आंबुलकर | Updated: September 7, 2017 1:45 AM

महाराष्ट्र शासनाच्या परिचर्या शिक्षण संस्था, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या नर्सिगविषयक विविध अभ्याक्रमांच्या २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.

उपलब्ध अभ्यासक्रमांचा तपशील- उपलब्ध अभ्यासक्रमांमध्ये एमएससी- नर्सिग ही पदव्युत्तर पदवी, पोस्ट बेसिक बीएससी-नर्सिग ही पदवी व पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिग हा पदविका अभ्यासक्रम यांचा समावेश आहे.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रिका विक्रीसाठी संपर्क- प्रवेश अर्ज व माहितीपत्रकासाठी २ सप्टेंबपर्यंत प्राचार्या, परिचर्या शिक्षण संस्था, सर ज.जी. रुग्णालय समूह परिसर, भायखळा, मुंबई- ४००००८ या पत्त्यावर संपर्क साधावा.

अर्ज व माहितीपत्रकासाठी भरावयाचे शुल्क- अर्ज व माहितीपत्रकासाठी एमएससी नर्सिग व पोस्ट बेसिक बीएससी नर्सिग या अभ्यासक्रमांसाठी खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी २००० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १५०० रु.) तर पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिग या अभ्यासक्रमासाठी खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी २०० रु. (राखीव वर्ग गटातील उमेदवारांनी १०० रु.) भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या परिचर्या शिक्षण संस्था, मुंबईची जाहिरात पहावी, संस्थेच्या दूरध्वनी क्र. ०२२- २३७०४६४४ अथवा २३७४४६५५ वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या  http://www.inemumbai.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख –  संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्राचार्या महाराष्ट्र शासन- परिचर्या शिक्षण संस्था, बाई मोतीबाई बिल्डिंग, सर ज.जी. रुग्णालय समूह परिसर, भायखळा, मुंबई- ४००००८ या पत्त्यावर ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

First Published on September 7, 2017 1:45 am

Web Title: nursing courses maharashtra government