जगात सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडेरिन किंवा फुताँगहुआ(ही खरे तर बोली आहे) किंवा सिम्प्लिफाइड चायनीज (ही लिपी आहे). मँडेरिनविषयी लिहिण्याआधी एक गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे. ‘मी चायनीज शिकतो’ हे वाक्य पूर्णत: चुकीचे आहे. चायनीज ही काही भाषा नाही. ज्याप्रमाणे भारतीय लोक हिंदी भाषेत संवाद साधतात. त्याचप्रमाणे चायनीज किंवा चिनी लोक मँडेरिनमधून संवाद साधतात. चीनशिवाय तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ इथेही मँडेरिन ही व्यवहाराची अधिकृत भाषा आहे.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

भारत-चीन यांच्यातील व्यापारी संबंध बघता या भाषेचे ज्ञान अवगत असणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. अभ्यासेतर उपक्रम किंवा ऑफिससोबत जोपासता येणारा छंद म्हणून याकडे न बघता व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टिकोनातून या भाषेचे ज्ञान असणे उपयुक्त ठरते.

मँडेरिन ही भाषा टोनल आणि पिक्टोग्राफिक आहे. त्यामुळेच ती इतर भाषांपेक्षा वेगळी आणि जराशी अवघड वाटते. टोनल म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर (शब्द किंवा चिनी स्क्रिप्ट) उच्चारण्याचे वेगवेगळे असे चार टोन्स आहेत. त्यामुळे कॅरेक्टरचा उच्चार जरी सारखा असला तरी त्याच्या टोनवरून त्याचा अर्थ पूर्ण बदलतो. पिक्टोग्राफिक म्हणजे चित्रलिपी. या भाषेत मुळाक्षरे नाहीत. आहेत ते थेट कॅरेक्टर्स. त्यामुळेच हे कॅरेक्टर्स त्यांच्या दिसण्या आणि उच्चारण्यावरून लक्षात ठेवणे हाच एक पर्याय. हे सगळे अवघड वाटत असले तरी गमतीची गोष्ट म्हणजे मँडेरिन ही व्याकरणाच्या दृष्टीने फारच सोपी भाषा आहे. लिंग आणि काळ यांचा फारसा गोंधळ नसल्याने एकदा वाक्यरचना कळली की ही भाषा सहज आपलीशी होते. अर्थात नियमित अभ्यास आणि सराव याला पर्याय नाही.

*   कशी शिकाल?

आंतरराष्ट्रीय पातळीवर मँडेरिनच्या एकूण सहा लेव्हल्स आहेत. त्या परीक्षेला एचएसके (हनयू शुईफिंग खाउशं, हनयू म्हणजे मँडेरिन, शुईफिंग म्हणजे लेव्हल आणि खाऊशं म्हणजे परीक्षा) म्हणतात. या सहाही लेव्हल्स उत्तीर्ण झाल्या याचा अर्थ तुम्ही मँडेरिन भाषेवर प्रभुत्व मिळवले. पहिली आणि दुसरी लेव्हल ही प्राथमिक लेव्हल आहे. तिसरी आणि चौथी ही इंटरमिजेट आणि पाचवी-सहावी लेव्हल म्हणजे अ‍ॅडव्हान्स्ड. प्रत्येक लेव्हलसाठी काही कॅरेक्टर्स आणि व्याकरण असते. मुळात मँडेरिनमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त कॅरेक्टर्स आहेत. सामान्य चिनी माणूस दैनंदिन जीवनात दोन हजार कॅरेक्टर्सचा वापर करतो. एचएसके-१ साठी ३०० कॅरेक्टर्स तर एचएसके-६ साठी ५००० कॅरेक्टर्स अभ्यासाला असतात. प्रत्येक परीक्षा ३०० गुणांची असून उत्तीर्ण होण्यासाठी १८० गुण मिळवणे गरजेचे असते. याशिवाय एचएसकेके म्हणजे हनयू शुईफिंग खौयू खाउशं म्हणजे तोंडी परीक्षाही असते. ही १०० गुणांची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ६० गुण मिळवायचे असतात.

* कुठे शिकाल?

मँडेरिन भाषा शिकवण्यासाठी कन्फुशिअस इन्स्टिटय़ूट जगभरात प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठातही या इन्स्टिटय़ूटतर्फे मँडेरिन शिकवली जाते. विद्यापीठात सहाही लेव्हल्सचं प्रशिक्षण दिलं जातं. संपर्क – – confucius-institute@mu.ac.in

फोन (०२२)-६५४३५६७

याशिवाय इंडो-चायना चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजकडूनही मँडेरिनचे प्रशिक्षण दिले जाते.

संपर्क – india_chinachamber@ vsnl.com

(०२२) ४००५६९४८

इंडो-सिनो ब्रिज ही संस्थाही मँडेरिनविषयी जागरूक आहे. भाषेबरोबरच चिनी संस्कृतीशी निगडित कार्यशाळा या संस्थेतर्फे भरवल्या जातात. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

संपर्क – info@indosinobridge.com

(०२२) २३८२३४१२, ९८२०२१७१८३

*  मँडेरिन शिकण्याचे फायदे

भारत-चीन यांच्यातील व्यापारी संबंध पूर्वापार चालत आलेले आहेत. सध्याच्या घडीला चीनची भारतात असणारी गुंतवणूक फार मोठी आहे. अशा वेळी चिनी उद्योजक, कंपन्या, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी अस्खलित संवाद साधू शकणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध आहेत. दुभाष्या, भाषांतरकार आणि शिक्षक अशा तिन्ही क्षेत्रांत नोकरीच्या प्रचंड संधी आहेत. एचएसके ३ किंवा ४ उत्तीर्ण झाल्यानंतर यापैकी कुठल्याही क्षेत्रात उत्तम पगाराची प्रतिष्ठित अशी नोकरी करणे शक्य आहे. याशिवाय दूतावास, ट्रॅव्हल कंपन्या, सरकारी दुभाष्या, टूरिस्ट गाइड, दोन देशांमधील सांस्कृतिक दुवा यासारख्या करिअरच्या जरा वेगळ्या वाटा खुल्या होतात. त्यामुळेच जगभरातील सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा हटके तर आहेच, पण तिच्या ज्ञानाने निर्माण होणाऱ्या संधीही तितक्याच हटके आहेत.