हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज येथे ‘ग्रामीण विकास’ विषयातील विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य ठरणाऱ्या प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा व संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा आहे. अभ्यासक्रमाचा उद्देश देशस्तरावर पदवीधर विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास क्षेत्रात शिक्षित-प्रशिक्षित करणे हा आहे.
 शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी कुठल्याही विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर १५ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
भविष्यकालीन संधी
अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास संघटना, स्वयंसेवी संस्था, ग्रामीण अथवा कृषीविषयक बँका इत्यादींमध्ये व्यापक स्वरूपाच्या संधी उपलब्ध आहेत.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह सर्वसाधारण गटाच्या अर्जदारांनी २०० रु. चा (राखीव गटातील उमेदवारांनी १०० रु. चा) एमआयडीसी पीजीडीआरडीएम यांच्या नावे असणारा व हैद्राबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज, हैदराबादची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nird.org.in/ pgdrdm या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज को-ऑर्डिनेटर (अ‍ॅडमिशन्स) सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज (सीपीजीएस), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायती राज, राजेंद्रनगर, हैदराबाद ५०००३० या पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.