डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे उपलब्ध असणाऱ्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश देण्यात येत आहे.

एमएससी फॉरेस्ट्री- उपलब्ध जागांची संख्या ३८. अर्जदारांनी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषी वा वन विज्ञान यासारख्या विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

एमएससी- वुड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- उपलब्ध जागांची संख्या ३८. अर्जदारांनी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र वा वन विज्ञान विषयांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

एमएससी एन्व्हायरॉन्मेंटल- उपलब्ध जागांची संख्या ३८. अर्जदारांनी विज्ञान, कृषी वा वन विज्ञान विषयांसह बीएससी अथवा पर्यावरण विज्ञान विषयातील बीई/ बीटेक पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.

एमएससी- पेपर टेक्नॉलॉजी- उपलब्ध जागांची संख्या- २० अर्जदारांनी रसायनशास्त्रासह बीएससी अथवा केमिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील बीई/ बीटेक पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.

विशेष सूचना- अर्जदारांनी वरील पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी ५०% (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५%) असावी. उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर विविध परीक्षा केंद्रांवर २० मे २०१८ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून १२०० रु. चा रजिस्ट्रार एफआरआयच्या नावे असणारा व देहराडून येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, देहराडमूनची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.fridu.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, कौलगड रोड, देहराडून २४८१९५ या पत्त्यावर २६ मार्च २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.