News Flash

आदिवासी शेतकऱ्यांसाठी वीज पंप योजना

महाराष्ट्रातील ८५ टक्के आदिवासी लोकसंख्या ही शेती व्यवसायाशी निगडित आहे.

महाराष्ट्रातील ८५ टक्के आदिवासी लोकसंख्या ही शेती व्यवसायाशी निगडित आहे. त्यापैकी ४० टक्के आदिवासी शेतकरी असून ४५ टक्के आदिवासी शेतमजूर आहेत. म्हणून आजही आदिवासींची अर्थव्यवस्था कृषी व कृषी संलग्न व्यवसायावर अवलंबून आहे. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा शेती विकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने १०० टक्के अनुदानावर वीज पंप/तेल पंप पुरविण्यात येतात. या योजनेखाली सर्वसाधारणपणे ३ किंवा ५ अश्वशक्तीचे वीज पंप/तेल पंप मंजूर करण्यात येतात. राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्याकडे किमान ६० आर (दीड एकर) आणि कमाल ६ हेक्टर ४० आर (१६ एकर) इतकी लागवाडीयोग्य जमीन उपलब्ध असणे या योजनेसाठी आवश्यक आहे.

योजनेसाठी पात्रता

  • आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप मंजूर करताना त्यांच्या शेतातील पाण्याचे साधन असलेल्या विहीर/नाल्यास कमीत कमी सहा महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • ६० आरपेक्षा कमी जमीन ज्यांच्या नावाने असेल अशा किंवा तीन लगतच्या जमीनधारकांना एकत्रित येऊन करार लिहून दिला तर एकापेक्षा अधिक लाभधारक एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • मात्र अशा एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांची एकूण जमीन ६० आरपेक्षा जास्त असली पाहिजे.
  • आदिवासी शेतकरी स्वत: जमीन कसत असला पाहिजे.
  • या योजनेखाली ज्या गावात/शेतात वीजपुरवठा केला जाऊ शकतो, त्या गावच्या शेतकऱ्याला वीज पंप व जेथे वीजपुरवठा केला जात नाही अथवा नजीकच्या तीन वर्षांत केली जाण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी तेल पंप पुरविण्यात येतो.
  • लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
  • लाभार्थी दारिद्रय़रेषेखालील असावा.
  • लाभार्थीनी सर्व कागदपत्रांसह योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:15 am

Web Title: power pump scheme for tribal farmers
Next Stories
1 डोळसपणे पाऊल टाका!
2 एमपीएससी मंत्र : प्रश्नांची फटकेबाजी
3 नोकरीची संधी
Just Now!
X