पंतप्रधान आवास योजना या कार्यक्रमाच्या अंतर्गत खासगी विकासकांच्या सहभागाने झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात येते. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या भागीदारीतून स्वस्त/परवडणारी घरे. लाभार्थीच्या पुढाकाराने करण्यात येणारी खासगी घरबांधणी किंवा सुधारणा यासाठी अनुदान.

लाभार्थी

  • लाभार्थीमधे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांचा समावेश होतो.
  • या योजने अंतर्गत व्यक्तिगत कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वत:चे प्रमाणपत्र/प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.
  • लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी, अविवाहित मुलांचा आणि/किंवा अविवाहित मुलींचा समावेश असेल.
  • या अभियाना अंतर्गत केंद्रीय मदत मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी भारताच्या कुठल्याही भागात लाभार्थी कुटुंबातील त्याच्या/तिच्या नावाने किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने पक्क्य़ा घराची मालकी असता कामा नये.
  • राज्य/केंद्रशासित प्रदेश, स्वतंत्र अधिकारात एक अंतिम तारीख ठरवू शकतात ज्यामधे लाभार्थी या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र ठरण्यासाठी त्या नागरी क्षेत्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

व्याप्ती

  • शहरी भागांसाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माध्यमातून, पात्र असलेल्या सर्व कुटुंबांना/लाभार्थीसाठी आहे.
  • हे अभियान केंद्र शासन पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी http://mhupa.gov.in/User_Panel/UserView.aspx?TypeID=1414