पात्रता

  • अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिष्ट व जैन समाजाचा समावेश.
  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • वयोमर्यादा किमान १६ ते ३२ वर्षे

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
  • शहरी भागासाठी – एक लाख तीन हजार रुपयांपेक्षा कमी,
  • ग्रामीण भागासाठी – ८१ हजारांपेक्षा कमी.
  • कर्ज मर्यादा- २ लाख ५० हजारापर्यंत
  • व्याजदर-३ टक्के
  • परतफेड : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्षे

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पारपत्रक
  • बँकेचे पासबुक
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक
  • उत्पन्न प्रमाणपत्र : कुटुंबप्रमुखाच्या नावे तहसीलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म क्रमांक १६.
  • विहित नमुन्यातील अर्जदार/जामीनदाराचे हमीपत्र
  • बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.

अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in