राजीव गांधी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग येथे खालीलप्रमाणे व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनपर फेलोशिप उपलब्ध आहे.

उपलब्ध विषयांचा तपशील- फेलोशिप योजनेअंतर्गत व्यवस्थापन क्षेत्रातील इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पब्लिक पॉलिसी मार्केटिंग मॅनेजमेंट फायनान्स अ‍ॅण्ड अकाउंटिंग, इन्फरमेशन सिस्टिम्स, ऑपरेशन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड क्वांटिटेटिव्ह टेक्निक, ऑर्गनायझेशनल बिहेविअर,ह्य़ुमन रिसोर्सेस अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, सस्टेनेबिलिटी कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलिटी अ‍ॅण्ड इथिक्स इ. विषयांचा समावेश आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी संबंधित विषयातील एमबीए वा तत्सम पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी वरील विषयात संशोधन कामाची आवड असायला हवी. संगणकाचे अद्ययावत् ज्ञान आवश्यक.

फेलोशिपची रक्कम व फायदे- फेलोशिप योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या फेलोशिप कालावधीत दरमहा २०००० ते ३०००० रु. संशोधन शिष्यवृत्ती व त्याशिवाय आकस्मिक खर्च, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन परिषदांचे शुल्क इ. फायदे देय असतील.

अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १००० रु. चा डिमांड ड्राफ्ट संस्थेच्या नावे पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- फेलोशिप योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राजीव गांधी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँगची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या https://www.iimshillong.ac.in/ अथवा fpm@iimshillong.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०१८ आहे.