अ) एअरमन ग्रुप एक्स (एज्युकेशन इन्स्ट्रक्टर वगळता)

पात्रता- सरासरी किमान ५०%  गुणांसह बारावी (विज्ञान) (गणित, फिजिक्स आणि इंग्रजी विषयांत किमान ५०%  गुण आवश्यक) किंवा मेकॅनिकल / इन्स्ट्रमेंटेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी/ काम्प्युटर सायन्स आणि इतर अलाइड इंजिनीअिरग डिप्लोमा किमान ५०%  गुणांसह  उत्तीर्ण (डिप्लोमाला इंग्रजी विषय नसल्यास दहावीला किमान  ५०% गुण आवश्यक.

(ब) एअरमन ग्रुप वाय (ऑटोमोबाइल टेक्निशियन, जीटीआय, आयएएफ (पी), आयएएफ (एस)  म्युझिशिअन आणि मेडिकल असिस्टंट ट्रेड वगळता)

पात्रता – सरासरी किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण (इंग्रजी विषयात  ५०% गुण आवश्यक

(क) ग्रुप वाय (मेडिकल असिस्टंट)

पात्रता- किमान ५०%  सरासरी गुणांसह बारावी (विज्ञान) (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण (इंग्रजी विषयात किमान ५०%  गुण आवश्यक)

वयोमर्यादा – तीनही पदांसाठी १७ ते २१ वष्रे (उमेदवाराचा जन्म दि. १३ जाने १९९८ ते २ जाने २००२ दरम्यानचा असावा)

ट्रेनिंग- जॉइंट बेसिक फेज ट्रेनिंग  (JBPT). बेसिक ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बेळगावी (कर्नाटक) येथे.

खइढळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना टेड ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. यशस्वीरीत्या ट्रेड ट्रेनिंग पूर्ण केल्यावर एअरमन म्हणून तनात केले जाईल.

स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान रु. १४,६००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

वेतन –  दरमहा एअरमन ग्रूप एक्स रु. ३३,१००/- + महागाई भत्ता.  एअरमन ग्रूप वाय रु. २६,९००/- + महागाई भत्ता.  + इतर भत्ते उदा. ट्रान्सपोर्ट अलाउन्स + एचआरए इ.

शारीरिक मापदंड – उंची – १५२.५ सेंमी,

छाती – किमान ५ सेंमी फुगविता आली पाहिजे.

वजन – उंचीच्या प्रमाणात वजन असावे. दोन्ही ग्रूपसाठी पात्र असलेले उमेदवार अर्ज करताना तसं नमूद करून दोन्ही ग्रूपसाठी एकाच वेळेला परीक्षा देऊ शकतात.

निवड पद्धती – ऑनलॉइन टेस्ट – दि. १०/११ मार्च २०१८ रोजी घेतली जाईल.

पात्र उमेदवारांना प्रोव्हिजनल अ‍ॅडमिट कार्ड फेज -१ परीक्षेसाठी त्यांनी दिलेल्या ई-मेलवर फेब्रु. १८ महिन्यांत पाठविले जातील. त्यांनी https://airmenselection.gov.in या संकेतस्थळावरून या कार्डची कलर िपट्र काढून घ्यावी.

ऑनलाइन परीक्षा कशी घेतली जाईल याचा व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल.

फेज -१ अ) ग्रूप एक्स ट्रेडसाठी इंग्रजी, फिजिक्स आणि गणित सीबीएसई बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन परीक्षा कालावधी ६० मिनिटे .

ब) ग्रुप वाय ट्रेडसाठी इंग्रजी सीबीएसई (बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित), रीझािनग आणि जनरल अवेअरनेस या विषयांवर ऑनलाइन टेस्ट कालावधी ४५ मिनिटे.

क) दोन्ही ग्रूप एक्स आणि ग्रूप वायसाठी इंग्रजी, फिजिक्स आणि गणित (बारावी सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित), रीझिनग आणि जनरल अवेअरनेस या विषयांवर आधारित ऑनलाइन टेस्ट कालावधी ८५ मिनिटे.  फेज -२ टेस्ट – एअरमन सिलेक्शन सेंटर येथे घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज https://airmenselection.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२ जानेवारी २०१८पर्यंत करावेत.